सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन

सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन

सोयाबीनची हमी भावाद्वारे खरेदी करण्यात यावी या मागणीसाठी नागपूरच्या उमरेडमध्ये बाजार समितीत आंदोलन करण्यात आले आहे तर वर्ध्यातही रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे.

  • Share this:

नागपूर,27 ऑक्टोबर: सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून  विदर्भात काही ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन चालले आहे. सोयाबीनची हमी भावाद्वारे खरेदी करण्यात यावी या मागणीसाठी नागपूरच्या उमरेडमध्ये बाजार समितीत आंदोलन करण्यात आले आहे तर वर्ध्यातही रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे.

नागपूरमध्ये आक्रमक शेतकऱ्यांनी बाजार समितीतून मोर्चा काढत तहसिल कार्यालयापर्यंत घोषणा देत आंदोलन केलं. या आंदोलनाला शेकडो शेतकरी उपस्थित होते. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने जाहिर केलेला ३ हजार ५० रुपये प्रतिक्विंंटल भाव द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन केले. या मोर्च्यात उमरेड आणि आसपासचे शेतकरी सहभागी झाले होते. सध्या सोयाबीनची खरेदी दोन हजार ते अडीच हजाराच्या दराने खरेदी होत असल्याच या आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

तर दुसरीकडे सोयाबीनला आधारभूत भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील उड्डाणपुलावरही रास्ता रोको आंदोलन केलं. नाफेडने गुणवत्तेच्या आधारावर खरेदी सुरु केली पण केवळ चार दिवसात १०३ क्विंटल खरेदी करण्यात आली . दररोज २००० क्विंटलच्या वर आवक असताना नाफेड खरेदी करीत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. सोयाबीन मातीमोल किमतीमध्ये व्यापारी विकत घेत असल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली. त्यामुळे जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती.

त्यामुळे आतातरी सोयाबीनला हमीभाव मिळतो का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

First published: October 27, 2017, 8:38 AM IST

ताज्या बातम्या