मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ओबीसी संघटना आक्रमक; उद्या बीडमध्ये आक्रोश आंदोलन करत रास्तारोको

ओबीसी संघटना आक्रमक; उद्या बीडमध्ये आक्रोश आंदोलन करत रास्तारोको

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समता परिषद (Samta Parishad) भव्य आक्रोश आंदोलन करणार आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समता परिषद (Samta Parishad) भव्य आक्रोश आंदोलन करणार आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समता परिषद (Samta Parishad) भव्य आक्रोश आंदोलन करणार आहे.

बीड, 16 जून : एकीकडे राज्यात आरक्षणासाठी मराठा (Maratha Reservation) समाज आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे मात्र आता ओबीसी समाजही आंदोलनाच्या (OBC reservation) तयारीत दिसून येतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे अशी भीती अनेकांना वाटत आहे, त्यात भर म्हणून आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समता परिषद (Samta Parishad) भव्य आक्रोश आंदोलन करणार आहे. समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी अशी माहिती दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण द्यावं मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका आधीपासून सर्व ओबीसी नेत्यांची राहिली आहे. मात्र आता आरक्षण वाचविण्यासाठी तसंच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या आदेशानुसार हे आंदोलन केलं जाणार आहे अशी माहिती सुभाष राऊत यांनी दिली आहे.

हे वाचा - 'डिवचण्याचा प्रयत्न करणार तर शिवसैनिक प्रत्युत्तर देणार' : महापौर किशोरी पेडणेकर

समता परिषदेकडून उद्या म्हणजेच 17 जूनला सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणार आहे. तसाच धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग यावेळी रोखला जाण्याची शक्यता आहे. हे आंदोलन पूर्णतः कोरोनाचे नियम पळून केलं जाणार आहे अशी माहितीही सुभाष राऊत यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची माहिती द्या

या कोरोना काळात ओबीसीचा डेटा गोळा करणं शक्य नाही त्यामुळे केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) ओबीसीबाबत माहिती द्यावी. तसंच निवडणूक तोंडावर आहे त्यामुळे ही कार्यवाही त्वरित व्हावी असं भुजबळ म्हणाले. तसंच ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार अशीही माहिती भुजबळ यांनी दिली.

आज नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या निवास्थानी बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यानंतर आता रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी समता परिषदेनं घोषणा केली आहे.  'समता परिषद आंदोलन हे ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आहे. राज्य सरकार अथवा केंद्र सरकार असेल कोणीही यावर मार्ग काढावा यासाठी ओबीसी समाज आंदोलन करणार आहे. इतर समाज ही आंदोलन करत आहे. ओबीसी समजाला धक्का न लावता मराठा समजाला आरक्षण द्यावे, यासाठी आमचे काही हरकत नाही. कोर्टात विषय संपला म्हणजे आरक्षण विषय संपला असं नाही, असंही भुजबळ म्हणाले.

First published:

Tags: Beed, ओबीसी OBC