मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आजपासून बेमुदत उपोषण, सरकारची कोंडी

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आजपासून बेमुदत उपोषण, सरकारची कोंडी

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

आजपासून मराठा समाज कोल्हापुरात आमरण उपोषण करणार आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

  कोल्हापूर, 27 नोव्हेंबर : कोल्हापूरमध्ये मराठा समाज आजपासून पुन्हा आंदोलन करणार आहे. आजपासून मराठा समाज कोल्हापुरात आमरण उपोषण करणार आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  दरम्यान, सोमवारी मुंबईला आंदोलन करण्यासाठी जाण्यावरून आंदोलक आणि पोलिसांत झटापट झाली. मोठं अटकसत्र सुरू होतं, बाचाबाची झाली. त्यामुळे आता या आंदोलनावर कोल्हापूर पोलीस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  तर आजपासून कोल्हापूरमध्ये मराठा आंदोलक ठिय्या आंदोलनही करणार आहे. तर आमरण उपोषण आणि ठिय्या आंदोलन करण्यासाठी आता दसरा चौकात स्टेज बांधण्यात येणार आहे. पण त्यालाही पोलीस विरोध करण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

  त्यामुळे एकीकडे सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे मराठा समाज तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे त्यामुळे सरकारसमोरच्या अडचणीत वाढ होणार इतकं नक्की.

  मराठा आरक्षणासंदर्भात आज सकाळी दहा वाजाता सर्वपक्षीय गट नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तर विरोधक या बैठकीत मराठा आरक्षण संदर्भात पूर्ण अहवाल विधीमंडळ सभागृहात पटलावर ठेवण्याबाबत ठाम भूमिकेवर आहेत.

  मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण आणि इतर शैक्षणिक सवलती सुविधा योजना सुरू ठेवण्याबाबत आग्रही भूमिका मांडणार अशी भूमिक मराठा आंदोलकांकडून घेण्यात आली आहे. एटीआर रिपोर्ट नाही तर संपूर्ण अहवाल मांडावा ही विरोधी पक्षांच्या गट नेत्यांची भूमिका आहे, अशी माहिती सुत्रांकजून देण्यात आली आहे.

  हेही वाचा: गुंता सुटणार का? मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

  संपूर्ण अहवाल मांडण्यास सरकार अनुकूल नाही तर विरोधकांची मागणी संपूर्ण अहवाल मांडण्याबाबतच ठाम आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे आरक्षणासाठी मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.

  29 तारखेला पटलावर मांडण्यात येणारं विधेयक 30 तारखेपर्यंत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं. महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीला विनोद तावडे, सुभाष देशमुख, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी निलंगेकर, विष्णू सावरा, एकनाथ शिंदे आणि दीपक सावंत उपस्थित होते.

  दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातला एटीआर म्हणजेच संपूर्ण अहवाल सादर करायचा की नाही यासंदर्भात आज म्हणजे मंगळवारी होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

  ...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL

  First published:
  top videos

   Tags: Government, Kolhapur, Maratha reservation, Protest for maratha reservation