मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Lockdown मध्ये फी वाढवली; मुंबई, नवी मुंबईतील 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव

Lockdown मध्ये फी वाढवली; मुंबई, नवी मुंबईतील 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव

फी न भरल्याने ऑनलाईन शिक्षण न दिल्याने या शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी नवी मुंबई, मुंबई आणि पनवेल महापालिकेने मुंबई उपसंचालकांकडे केली होती.

नवी मुंबई, 8 जुलै : कोरोनाच्या या संकट काळातही (Corona Pandemic) अनेक खासगी शाळांची मनमानी समोर आली होती. अनेक शाळांनी या संकट काळात फी वाढ (Fees hike from many schools) केल्याचंही समोर आलं होतं. फी वाढ करणे, फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावणे, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना निकालपत्र न देणे असे कृत्य करुन विद्यार्थी आणि पालकांना त्रास देणाऱ्या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द (Proposal of Cancellation NOC) करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

नवी मुंबई विभागातील एकूण पाच शाळा, मुंबईतील दोन आणि पनवेलमधील एका शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याच्या संदर्भातील प्रस्ताव शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देवून शाळा बालकांचा मोफत आणि सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009च्या कलम 16 आणि 17चे उल्लंघन करत आहे. त्यामुळे अशा शाळांवर शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याने नवी मुंबई मनपा आयुक्तांनी या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक), रायगड जिल्हा परिषध यांच्याकडून शिफारसींसह प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना पाठवला आहे.

"काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्यांनाच मंत्रिपद, भाजपचे नेते किती कमकुवत याचे हे उदाहरण" जयंत पाटलांचा टोला

मुंबई विभागीय उपसंचालकांकडून पुणे शिक्षण संचालकांना प्रस्ताव सादर

लॉकडाऊन काळात फी वाढ करणे

पालकांना फी भरण्यास तगादा लावणे

फी न भरल्याने निकालपत्र न दाखवणे

विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती न देणे

फी न भरल्याने ऑनलाईन शिक्षण न दिल्याने या शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी नवी मुंबई, मुंबई आणि पनवेल महापालिकेने मुंबई उपसंचालकांकडे केली होती. या मागणी नुसार मुंबई विभागीय उपसंचालकांनी पुणे शिक्षण संचालकांना प्रस्ताव सादर केला आहे.

First published:

Tags: Lockdown, Mumbai