मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'भविष्यवाणी आणि पोपट ज्यांचा धंदा तेच...'मलिक यांचा फडणवीसांना सणसणीत टोला

'भविष्यवाणी आणि पोपट ज्यांचा धंदा तेच...'मलिक यांचा फडणवीसांना सणसणीत टोला

 'देवेंद्र फडणवीस माननीय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहे'

'देवेंद्र फडणवीस माननीय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहे'

'पोपटाचा धंदा माझा नाही. देवेंद्र फडणवीस यांचा पोपट चिठ्ठ्या काढत आहे आणि भविष्यवाणी करत आहे'

  • Published by:  sachin Salve

नागपूर, 29 ऑक्टोबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून एकीकडे एनसीबीची कोंडी झाली आहे. तरदुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. 'भविष्यवाणी आणि पोपट ज्यांचा धंदा आहे ते पोपट असू शकता. नवाब मलिक (nawab malik) होऊ शकत नाही' असा सणसणीत टोला नवाब मलिक यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (devedendra fadanvis) यांना लगावला.

नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे पोपट आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना नवाब मलिक यांनी आर्यन खान अटक प्रकरणावरून एनसीबीवर जोरदार टीका करत देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

'पोपटाचा धंदा माझा नाही. देवेंद्र फडणवीस यांचा पोपट चिठ्ठ्या काढत आहे आणि भविष्यवाणी करत आहे.  भविष्यवाणी आणि पोपट ज्यांचा धंदा आहे ते पोपट असू शकता. नवाब मलिक होऊ शकत नाही, असा सणसणीत टोला मलिक यांनी फडणवीस यांना लगावला.

Bharti University Recruitment: भारती विद्यापीठ पुणे इथे विविध पदांसाठी भरती

'मी अजून एक माहिती देतोय. वानखेडे यांनी ज्या काही केसेस केल्या. त्याची संख्या बघा दोन ग्रॅम ,चार ग्रॅम, पाच ग्रॅम आहे. एका केसमध्ये 30 सेलिब्रिटींना बोलवले मात्र कुठलीही अटक नाही. हे सगळं खंडणीसाठी केले. भाजपच एक मोठ्या नेत्याचा जवळचा माणूस रोज तिकडे जातो. मी विधिमंडळात याबाबत पटलावर ठेवले आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

समीर वानखेडे यांनी 100 पेक्षा जास्त लोकांना 26 खोट्या केसेसमध्ये अडकवले आहे आणि काही जणांना अटक केली आहे. ncb चे अधिकारी खंडणी मागत आहे. अनुराग कश्यप यांनी त्यांचे अनुभव सांगितले. अशा अनेकांना त्यांनी  अडकवले, असा आरोपही मलिक यांनी केला.

मुलींनी दुसऱ्या महिलेसोबत बापाला पकडलं रंगेहाथ; बेदम मारहाणीचा Video आला समोर

एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर यांना विनंती करतो. ठराविक लोकांकडून माहिती घेऊ नको. योग्य माहिती घेऊन चौकशी करा. निष्पाप नायजेरियन नागरिकाला अडकवले गेले आहे. या प्रकरणी आता ज्ञानेश्वर यांना लेखी पत्र लिहणार आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

'बॉलिवूडला drugs अड्डा बनल्याचे चित्र तयार केले.याकरता राज्यातील भाजपचा हात आहे. योगी नोएडा येथे फिल्म सिटी बनवत आहे त्याकरता भाजपात असलेले कलाकार प्रयत्न आहे, असंही मलिक म्हणाले.

First published: