मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चुकलो, पण व्यक्ती म्हणून मी वाईट नाही; पत्र लिहून प्राध्यापकाच्या मुलानं सोडलं घर

चुकलो, पण व्यक्ती म्हणून मी वाईट नाही; पत्र लिहून प्राध्यापकाच्या मुलानं सोडलं घर

File Photo

File Photo

Aurangabad News: बारावीत शिकणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्यानं आपल्या प्राध्यापक वडिलांना भावनिक पत्र लिहून घर सोडलं आहे. त्यानं घर सोडण्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

  • Published by:  News18 Desk

औरंगाबाद, 13 ऑगस्ट: बारावीत शिकणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्यानं आपल्या प्राध्यापक वडिलांना भावनिक पत्र लिहून घर सोडल्याची घटना समोर आली आहे. घर सोडण्यापूर्वी त्यानं आपल्या आई वडिलांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यानं झालेल्या चुकीसाठी माफी मागितली आहे. तसेच आपण व्यक्ती म्हणून वाईट नाही. चांगला माणूस बनून दाखवेन असंही त्यांनं आपल्या पत्रात लिहिलं आहे. याप्रकरणी प्राध्यापक वडिलांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घर सोडून निघून गेलेला 17 वर्षीय तरुण इयत्ता बारावीत शिकतो. त्याचे वडील औरंगाबाद येथील सिडको परिसरात खाजगी कोचिंग क्लास चालवतात. पण संबंधित युवकाला मागील काही काळापासून ऑनलाइन गेमचा नाद लागला होता. या गेममध्ये गुंतवणूक केल्यास, भरपूर फायदा होईल या आमिषाला बळी पडून संबंधित तरुणानं वडिलांच्या खात्यातून 9 हजार रुपये इकडे गुंतवणूक केले. पण त्याला तोटा झाला. त्यामुळे त्यानं सर्व पैसे गमावले. बँकेतून पैसे कमी झाल्याचा मेसेज वडिलांना आला. बँकेतून पैसे कमी झाल्याबाबत वडिलांनी आपल्या मुलाकडे विचारणा केली.

हेही वाचा-अपघातग्रस्त युवक मागत राहिला मदत पण जनता VIDEO काढण्यातच बिझी; विरारमधील घटना

पण आपल्याला संबंधित पैशांबाबत काही माहीत नसल्याचं तरुणानं आपल्या वडिलांना सांगितलं. त्यानंतर त्यानं 10 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता आपल्या आई-वडील आणि विवाहित बहिणीसोबत गप्पा मारत जेवण केलं. आपली चूक घरच्यांना कळली, तर ते रागावतील या भीतीनं तरुणानं रात्री आपल्या आई वडिलांना उद्देशून पत्र लिहून घर सोडलं आहे. या पत्रात त्यानं आपल्या झालेल्या चुकीसाठी माफी मागितली आहे. तसेच मी चुकलो असलो तरी एक व्यक्ती म्हणून वाईट नाही, असंही त्यानं आपल्या पत्रात लिहिलं आहे.

हेही वाचा-बंदूक नाही, तर चिठ्ठी घेऊन बँकेत चोरी करायला पोहोचला चोर, मजकूर वाचून सगळे थक्क

मी घरातून निघून जात आहे, पण त्यासाठी तुम्ही काळजी करायचं काहीही कारण नाही. मी जेथे पण जाईल त्याठिकाणी सुखरूप राहिल. तुम्ही केलेले संस्कार कधीही विसरणार नाही. एक चांगला माणूस बनून दाखवेल. असंही त्यानं संबंधित पत्रात लिहिलं आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या पालकांनी पुंडलिकनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Aurangabad