मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

क्राईम सिरीज पाहून केली राजन शिंदेंची हत्या, अखेर 7 दिवसांनी मारेकरी सापडला!

क्राईम सिरीज पाहून केली राजन शिंदेंची हत्या, अखेर 7 दिवसांनी मारेकरी सापडला!

अखेर अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकारणात पोलिसांनी तपास करण्यात यश मिळवलं आहे. शिंदे कुटुंबातीलच अल्पवयीन सदस्यने हा गुन्हा केला.

अखेर अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकारणात पोलिसांनी तपास करण्यात यश मिळवलं आहे. शिंदे कुटुंबातीलच अल्पवयीन सदस्यने हा गुन्हा केला.

अखेर अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकारणात पोलिसांनी तपास करण्यात यश मिळवलं आहे. शिंदे कुटुंबातीलच अल्पवयीन सदस्यने हा गुन्हा केला.

औरंगाबाद, 18 ऑक्टोबर : औरंगाबाद (Aurangabad) शहरात प्राध्यापक राजन शिंदे (rajan shinde murder case) खून प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. राजन शिंदे यांची हत्या का आणि कुणी केली, याचा गेल्या सात दिवसांपासून शोध घेतला जात होता. अखेर पोलिसांनी (aurangabad police) या खून प्रकरणाचा छडा लावला आहे. राजन शिंदे यांची हत्या त्यांच्या घरातील अल्पवयीन सदस्याने केली आहे.

औरंगाबादच्या एन 2 भागात राहणारे प्राध्यापक राजन शिंदे यांच्या खून गेल्या आठवड्यात 11 ऑक्टोबर रोजी झाला होता. सोमवारी पहाटे राहत्या त्यांच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्यारानं वार कऱण्यात आले होते, तर त्यांच्या पोटावर बसून त्यांच्या हाताच्या नस कापण्यात आल्या होत्या.  राजन शिंदे यांचा गळा चिरण्यात आला. त्यांच्या दोन्ही हाताच्या नस कापण्यात आल्या आणि त्यांच्या डोक्यावर हातोडीने प्रहार करण्यात आले. त्यामुळे त्यांचा मृत्यू जागेवरच झाला. या खुनाचा तपास पोलिसांसाठी आव्हान होते. घरातीलच कुणीतरी खून केला असावा असा पोलिसांना संशय होता.

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर इथे 1,42,400 रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज

त्यानुसार पोलिसांची 3 पथक तपास करीत होते. घरासमोरील विहिरीत खून केल्यानंतर खुनासाठी वापरलेली हत्यार टाकण्यात आल्याचा पोलिसांना संशय होता.  त्यानुसार, विहिरीतून पाणी उपसून खुनाकरिता वापरलेली हत्यार जप्त करण्यात आले आहे.

अखेर अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकारणात पोलिसांनी तपास करण्यात यश मिळवलं आहे. शिंदे कुटुंबातीलच अल्पवयीन सदस्यने हा गुन्हा केलाय म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या अल्पवयीन सदस्यांच्या कृत्याबाबत कुटुंबियांना सुद्धा कल्पना नव्हती. खुनासाठी वापरलेले डंबेल्स, रक्ताने माखलेला टॉवेल आणि चाकू घराजवळच्या विहिरीतून काढून जप्त केले आहे.

YESS! नवा व्हेरियंट नाही, तिसऱ्या लाटेचा धोकाही टळला! वाचा सविस्तर

प्राध्यापक शिंदे हे औरंगाबादच्या मौलाना आझाद कॉलेज मध्ये इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख होते. राजन शिंदे चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांची ओळख होती.

का केला खून?

राजन शिंदे हे खूप रागावतात सतत अपमानित करतात हा राग होता म्हणून त्याने हे कृत्य केलं. तसंच प्राध्यापक शिंदे आणि अल्पवयीन सदस्य यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते, करिअर आणि शिक्षण याबाबत दोघांमध्ये खटके उडत होते. नातवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक यामुळेही राग होता. घटने आधी रात्री दोघांमध्ये जोरात भांडण झाले. त्यातून राग मनात धरून खून झाला. धक्कादायक म्हणजे, हा अल्पवयीन सदस्य गुन्हेगारी संबंधीत वेब series पाहत होता. त्यातून त्याने खून करण्याचे ठरवले. ज्या प्रकारे एखाद्या सिरीयलमध्ये खून होतो तसाच कट त्याने रचला होता. तत्कालीन भांडण कारणीभूत ठरले आणि त्यातून हे सगळं घडलं. सदर अल्पवयीन सदस्याला बाल निरीक्षणगृहात पाठवले आहे.

First published: