मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्राध्यापकांना पगारही पुरेना, बळकावली 102 एकर इनामी जमीन!

प्राध्यापकांना पगारही पुरेना, बळकावली 102 एकर इनामी जमीन!

या प्रकरणी 2 वरिष्ठ प्राध्यापक, 1 विद्यमान सरपंच व अन्य 1 अशा 4 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी 2 वरिष्ठ प्राध्यापक, 1 विद्यमान सरपंच व अन्य 1 अशा 4 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी 2 वरिष्ठ प्राध्यापक, 1 विद्यमान सरपंच व अन्य 1 अशा 4 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बीड, 04 ऑगस्ट : आष्टी मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार भीमसेन धोंडे (bjp ex mla bhimsen dhonde) यांच्या महाविद्यालयातील चार प्राध्यापकांनी (Professor ) सरपंचाला हाताशी धरून तब्बल 102 एकर इनामी जमीन बळकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन प्राध्यापकांसह चार जणांना अटक झाल्याने खळबळ उडालीय. खुद्द आमदारांनी ही जमीन हडपल्या चा आरोप सामजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या संदर्भातील माजी आ भीमराव धोंडे यांच्याशी संपर्क केला असता बोलण्यास नकार दिला.

बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या रुई नालकोल येथील शेख महंमदबाबा यांची 102 एकर इनामी जमीन खोटे दस्तावेज तयार करून बळकावल्या प्रकरणी चार व्यक्ती व खोटी साक्ष दिलेले दोन अशा 6 व्यक्तींवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 2 वरिष्ठ प्राध्यापक, 1 विद्यमान सरपंच व अन्य 1 अशा 4 व्यक्तींना, मध्यरात्री 1 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्याध्यापक व एक प्राध्यापक पोलिसांना चकमा देत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

अपहरण करून बाळाला परराज्यात विकलं; 48तासांत मुंबई पोलिसांनी घडवली मायलेकराची भेट

दरम्यान, विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याऐवजी चक्क इनामी जमिनी प्राध्यापक बळकायला लागल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या खोट्या दस्तऐवजावर साक्षीदार म्हणून संजय भाऊसाहेब नालकोल व शरद नानाभाऊ पवार यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या. तर अजिनाथ बोडखे, गोपीनाथ बोडखे, मुस्ताक शेख हे कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

तर सुरेश बोडखे हे आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टीचे मुख्याध्यापक आहेत. हे माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या संस्थेतील सर्व कर्मचारी असल्यानं खळबळ उडाली आहे.

अजबच! 40 वर्षांपासून एक मिनिटही झोपली नाही ही महिला; आज आहे अशी अवस्था

दरम्यान, बीड जिल्ह्यात जवळपास 27 हजार एकर इनामी जमीन आहे. मात्र मस्जिद, दर्गा, मंदिर व इतर देवस्थानच्या इनामी जमिनीचे बनावट दस्ताऐवज तयार करून खरेदी विक्री सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील इनामी जमिनी लुटणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

First published:

Tags: जमीन, प्राध्यापक