विदर्भात काळा दिवस साजरा, मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शनं

विदर्भात काळा दिवस साजरा, मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शनं

आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय. पण विदर्भात मात्र हा काळा दिवस म्हणून पाळला गेलाय.

  • Share this:

01 मे : आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय. पण विदर्भात मात्र हा काळा दिवस म्हणून साजरा झाला. त्यामुळे विदर्भवादी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घराबाहेर प्रतिकात्मक रास्ता रोको केलं. पंधरा विदर्भवाद्यांना  पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

विदर्भ राज्य आघाडी(वीरा) तर्फे आज(सोमवारी) महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रक्ताक्षरी अभियानाचे आयोजन विदर्भवादी नेते अॅड श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांना विदर्भवादी स्वतःच्या रक्ताने अंगठा स्वाक्षरी करून विदर्भ राज्याची मागणी करणारे निवेदन देणार आहेत.

तर यवतमाळ शहरात आज एकाच ठिकाणी महाराष्ट्राचा आणि वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला. पालिकेसमोर आधी विदर्भवादीयांनी विदर्भवादी नेते बापूजी अणे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, आणि स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवला. नंतर याच ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना वंदन करत शिवसेना कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा नारा दिला.

दरम्यान, स्वतंत्र विदर्भाची ही चळवळ नसून फक्त वळवळ आहे, अशी टीका सेनेच्या राजेंद्र गायकवाड यांनी केली.

First published: May 1, 2017, 9:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading