लोकसभा 2019: प्रियांका गांधी महाराष्ट्रातून प्रचाराचा नारळ फोडणार?

लोकसभा 2019: प्रियांका गांधी महाराष्ट्रातून प्रचाराचा नारळ फोडणार?

इंदिरा आणि सोनिया गांधी यांच्या प्रमाणेच प्रियांका यांनी देखील नंदुरबार येथूनच प्रचाराची सुरुवात करावी अशी मागणी केली जात आहे.

  • Share this:

मुंबई , 05 फेब्रुवारी: आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्रतील नंदुरबार येथून करावा अशी मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या प्रचाराचा इतिहास पाहिल्यास इंदिरा गांधी त्यानंतर सोनिया गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबार येथून केली होती. इंदिरा आणि सोनिया गांधी यांच्या प्रमाणेच प्रियांका यांनी देखील नंदुरबार येथूनच प्रचाराची सुरुवात करावी अशी मागणी केली जात आहे.

हे देखील वाचा: प्रियांका गांधीबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? 16 व्या वर्षीच...

नेहरु भवन मधल्या इंदिरा गांधींच्या 'त्या' खोलीला आहे प्रियांकांची प्रतीक्षा!

प्रियांका गांधी पंतप्रधान होणार; 1993ची भविष्यवाणी खरी ठरणार?

यासंदर्भातील पत्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवण्यात आले आहे. मात्र अद्याप यासंदर्भात निर्णय घेतला गेला नाही. पण काँग्रेसचा इतिहास पाहता यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेल्या या मतदारसंघातून गेल्या 6-7 निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार यशस्वी झाला आहे. काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जाते.

या मतदारसंघात आदिवासीची मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असल्यामुळे हा मतदारसंघाचा दोन्ही राज्याच्या राजकारणावर प्रभाव पडतो.

स्थानिक नेत्यांनी देखील प्रियांका गांधी यांची पहिली सभा नंदूरबारमध्ये घेण्याची मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी या काँग्रेसच्या स्टार प्रचारक असणार आहेत. त्यामुळे त्यांची पहिली सभा कोठे होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

First published: February 5, 2019, 1:27 PM IST

ताज्या बातम्या