प्रियंका चतुर्वेदींनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिवसेनेला दिला हात

प्रियंका चतुर्वेदींनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिवसेनेला दिला हात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 एप्रिल : शुक्रवारी सकाळी प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती देत शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश केला.

प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी या दिल्लीतल्या शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होत्या. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

राहुल गांधींना मोठा धक्का, प्रियंका चतुर्वेदींनी दिला राजीनामा

पक्षात गुंडांना प्राधान्य दिले जात असल्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटर प्रोफाईलमधून काँग्रेस प्रवक्ता असल्याचं काढून टाकलं. त्यांनी गुरुवारी रात्री काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्ष राहुल गांधींकडे दिला. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाले असताना प्रचाराच्या ऐन धामधुमीत राष्ट्रीय प्रवक्त्या असलेल्या चतुर्वेदींच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला.

नेमकं काय झालं?

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सप्टेंबर 2018मध्ये राफेलच्या भ्रष्टाचारावर मथुरा इथं पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. त्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व कार्यकर्त्याचं निलंबन पक्षाने मागे घेतलं. त्यामुळे प्रियंका दुखावल्या गेल्या आणि त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षासाठी शिवीगाळ सहन केली, ट्रोलिंग सहन केलं, घाम गाळला, मात्र आपल्यासोबत दुर्व्यवहार करणाऱ्यांना कुठलीही शिक्षा न करता त्याचं निलंबन मागे घेण्यात आलं हे अतिशय दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केली होती.

काय आहे हे प्रकरण?

राफेल करारावरून प्रियंका चतुर्वेदी यांनी मथुरेत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले होते. या घटनेनंतर संबंधित नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर या नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान देण्यात आले आहे. प्रियंका यांनी पक्षाला लिहलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे.

सर्वच पक्ष सारखे

निवडणुका असल्याने मतांसाठी राजकीय पक्ष कुठल्याही थराला जातात. प्रियंका या काँग्रेसच्या ज्येष्ठ प्रवक्त्या आहेत. त्यांच्याशी वाईट वागणाऱ्या लोकांना पुन्हा पक्षात घेत असतील तर ते अतिशय चुकीचं असल्याचं मत पत्रकार रामकृपाल सिंह यांनी व्यक्त केलं. मतांसाठी राजकीय पक्ष काहीही करायला तयार होतात असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

'हेमंत करकरे यांना मारून दहशतवाद्यांनी माझं सूतक संपवलं'

First published: April 19, 2019, 1:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading