धक्कादायक! 40 फूट खोल दरीत कोसळली खासगी बस, 4 जणांचा मृत्यू तर 35 गंभीर जखमी

धक्कादायक! 40 फूट खोल दरीत कोसळली खासगी बस, 4 जणांचा मृत्यू तर 35 गंभीर जखमी

अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

नंदुरबार, 21 ऑक्टोबर : धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली खासगी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळ पुलावरून जात असताना 30 ते 40 फूट खोल दरीत ही खासगी बस कोसळून मोठा अपघात झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बस दरीत कोसळल्यामुळे या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 35 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी या 35 प्रवाशांना बाहेर काढलं असून तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचा-मोठी बातमी! इंद्रावती नदीमध्ये बुडाली बोट, काही लोक बुडाल्याची शक्यता

धुळे सूरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात पहाटेच्या सुमारास अचानक बस दरीत कोसळली. हा अपघात नेमका कशामुळे झाला? कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं की आणखीन काही याचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. जळगावहून सूरतच्या दिशेनं ही बस जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 21, 2020, 8:13 AM IST
Tags:

ताज्या बातम्या