Home /News /maharashtra /

सातारा: पैशांसाठी माणुसकी विसरला सावकार, नवजात बाळाला आईच्या कुशीतून नेलं हिसकावून

सातारा: पैशांसाठी माणुसकी विसरला सावकार, नवजात बाळाला आईच्या कुशीतून नेलं हिसकावून

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Satara: सातारा शहरातील मंगळवार पेठ परिसरातील एका खाजगी सावकाराने (private money lender) व्याजांच्या पैशासाठी एका दाम्पत्याचा क्रूरपणे छळ (Inhuman persecution for money) केला आहे. आरोपीनं व्याजांच्या पैशांसाठी दोन महिन्यांच्या चिमुकलीला आईच्या कुशीतून हिसकावून नेलं आहे.

पुढे वाचा ...
    सातारा, 22 जानेवारी: सातारा (Satara) शहरातील मंगळवार पेठ परिसरातील एका खाजगी सावकाराने (private money lender) व्याजांच्या पैशासाठी एका दाम्पत्याचा क्रूरपणे छळ (Inhuman persecution for money) केला आहे. 30 हजार रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात आरोपींनी एका वर्षाच चौपट रक्कम वसूल केली आहे. तरीही सावकाराची भूक भागली नाही, त्यामुळे आरोपी सावकाराने पीडित दाम्पत्याच्या अवघ्या दोन महिन्यांच्या मुलीला उचलून नेलं आहे. आरोपींनी आईच्या कुशीतून बाळाला ओढून नेलं होतं. चार महिने बाळाची आईपासून ताटातूट केल्यानंतर, अखेर पीडित दाम्पत्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत. आरोपी सावकार दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची कसून चौकशी केली आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील मंगळवार पेठ परिसरातील ढोणे कॉलनीत राहणाऱ्या अभिषेक कुचेकर यांनी आर्थिक अडचणीतून सदर बाजार परिसरातील एका दाम्पत्याकडून 30 हजार रुपये व्याजाने घेतले होते. हेही वाचा-जीवलग मित्रच झाले एकमेकांचे दुश्मन; एकावर वार, तर दुसऱ्याची गोळ्या झाडून हत्या फिर्यादी कुचेकर यांनी मुद्दल आणि व्याज मिळून 60 हजार रुपये आरोपी दाम्पत्याला परत केले. एका वर्षाच चौपट व्याज वसूल करून देखील आरोपी सावकार दाम्पत्याची भूक भागली नाही. आरोपींनी सतत कुचेकर यांच्याकडे पैशांची मागणी केली. एवढंच नव्हे तर आरोपी सावकाराने चार महिन्यांपूर्वी कुचेकर यांच्या दोन महिन्याच्या चिमुकलीला उचलून नेलं आहे. आरोपींनी आईच्या कुशीतून बाळाला हिसकावून नेलं आहे. हेही वाचा-मित्र बायकोवर करत होता बलात्कार अन् पती देत राहिला पहारा, हिंगोलीतील घटना दरम्यान, पीडित कुचेकर दाम्पत्य आपल्या मुलीला परत मिळवण्यासाठी आरोपींच्या घरी गेले होते. यावेळी आरोपीनं 'घरी आला तर पाय काढीन, जिवे मारून टाकीन' अशी धमकी दिली. तेव्हापासून हे पीडित दाम्पत्य आरोपींकडून होणारा छळ निमूटपणे सहन करत होतं. अखेर आरोपींच्या त्रासाला कंटाळून कुचेकर यांनी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपासाची चक्र फिरवली आहेत. पोलिसांनी हिसकावून नेलेल्या चिमुकलीला ताब्यात घेतलं असून ती सुखरूप आहे. आरोपी सावकार दाम्पत्याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Satara

    पुढील बातम्या