बाळासाहेब थोरातांचे 'हात' बळकट करायचेय, पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक विधान

बाळासाहेब थोरातांचे 'हात' बळकट करायचेय, पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक विधान

महाविकास आघाडीमधील अनेकांच्या भूवया उचावल्या

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर: रणजितसिंह देशमुख यांच्यावर आमच्याकडून अन्याय झाला असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन स्वगृही परतलेले रणजितसिंह देशमुख यांचं त्यांनी स्वागत केलं आहे.

रणजितसिंह हे अत्यंत तडफेने काम करणारे नेते आहेत. आपण तीन पक्ष सत्तेत आहेत, त्यातून पक्ष बळकट करायचा आहे

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करायचे आहेत, असं सूचक विधान देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अनेकांच्या भूवया उचावल्या आहेत.

हेही वाचा..गडकरींच्या बंगल्यासमोर 'दिवाळी आंदोलन, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांना अटक

बाळासाहेब थोरात म्हणाले, रणजित देशमुख यांनी सूतगिरणी यशस्वी केली, याचं काय रहस्य आहे. हे त्यांनाच विचारावा लागेल. तर पृथ्वीराज चव्हाण हे देशपातळीवरील नेते आहेत. राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी त्यांचं मार्गर्शन लागणार आहे.

म्हणून साताऱ्यातील जबाबदारी तरुणांनी घेतली पाहिजे. पुन्हा एकदा काँग्रेसला वैभव मिळवून देण्याचं काम आपलं आहे. थोड्या अडचणी आहेत, पण आपल्याला परिश्रम घ्यायचे आहेत. आपण जनतेसाठी काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

तुम्ही मोठे व्हा, पक्ष आपोआप मोठा होईल, असंही बाळासाहेब थोरात यांनी रणजितसिंह देशमुख यांना उद्देशून सांगितलं.

दरम्यान, माणगाव खटावचे जिल्हा परिषद माजी सदस्य आणि शिवसेनेचे तरुण नेते रणजितसिंह देशमुख (leader Ranjitsinha Deshmukh) स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये आले. रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. यासोबतच महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीस दयानंद चोरघे (Dayanand Choraghe) यांनी भाजपला रामराम करत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ठाणे जिल्हापरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दयानंद चोरघे यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसची ताकद वाढणार

जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माण-खटाव विधानसभा मतदारसंघात पक्षाचं नुकसान झालं होतं. आता रणजितसिंह हे स्वगृही परतल्यानं काँग्रेसची ताकद आणखी वाढणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

रणजितसिंह देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष तसेच सातारा जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष उभारी घेईल असा विश्वास जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

कोण आहेत रणजितसिंह देशमुख?

रणजितसिंह देशमुख हे आधी काँग्रेसमध्येच होते. मात्र, 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. रणजितसिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2007 साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विकास कामे करत माण- खटाव तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची पाळुमुळे घट्ट केली.

हेही वाचा..महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही ओवेसींचा डंका! एका वर्षात पालटवलं निवडणुकीचं चित्र

दरम्यान,  2003 च्या दुष्काळात सोनिया गांधी यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौऱ्याचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यामागे तत्कालीन युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र काही कारणास्तव त्यांनी 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: November 11, 2020, 1:07 PM IST

ताज्या बातम्या