लोकप्रतिनिधींच्या परदेश दौऱ्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा आक्षेप

लोकप्रतिनिधींच्या परदेश दौऱ्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा आक्षेप

महाराष्ट्रात तुरीचा प्रश्न चिघळलेला असताना फुंडकर ऑस्ट्रेलियात कसला कृषी दौरा करतायत? पुण्यात कचऱ्याचे ढिग लागलेले असताना बापट, टिळक तिथं काय करतायत असा सवाल काँग्रेसनं केलाय.

  • Share this:

05 मे : आपल्याकडे उन्हाळा सुरू झाला की नेत्यांचे अभ्यास दौरे सुरू होतात. आता एक तर नेते आणि त्यात अभ्यास असं काही गणित जुळत नाही... नेते अभ्यास करतात हेच मुळात आपल्या मानसिकतेला पटत नाही. बरं अभ्यासच करायचा तर परदेशात का? पुणे, फुरसुंगी देवाची ऊरूळी का नाही? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी नेत्यांच्या ऑस्ट्रेलिया अभ्यास दौऱ्यावर आक्षेप घेतलाय.

पांडुरंग फुंडकर, गिरीश बापट, रामराजे निंबाळकर, नीलम गोऱ्हे, मुक्ता टिळक, संजय दत्त, असे जवळपास महाराष्ट्रातले पंधरा नेते सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. नेत्यांच्या ह्याच दौऱ्यावरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात तुरीचा प्रश्न चिघळलेला असताना फुंडकर ऑस्ट्रेलियात कसला कृषी दौरा करतायत? पुण्यात कचऱ्याचे ढिग लागलेले असताना बापट, टिळक तिथं काय करतायत असा सवाल काँग्रेसनं केलाय.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या शिष्टमंडळात माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे अशा काँग्रेस नेत्यांचाही समावेश आहे. तरीही चव्हाणांनी आक्षेप घेतलाय. तसं पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. पण भाजपला वाटतं की असे दौरे झालेच पाहिजेत.

नेत्यांचे हे परदेश दौरे नेमके पर्यटन दिवसातच कसे येतात? त्यासाठी जनतेचा पैसा का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. बरं दौऱ्यावर गेले तर त्याचा खरंच किती फायदा होतो हेही महत्वाचं.

ऑस्ट्रेलियाच्या अभ्यास दौऱ्यातून बापट आणि मुक्ता टिळकांना पुण्याचा कचरा प्रश्न जरी मिटवता आला तरी अभ्यास दौरा सत्कारणी लागला असं म्हणता येईल. नसेल तर कमीत कमी सगळ्या अभ्यास दौऱ्यांचं मुल्यांकन करावं आणि ज्यांनी अभ्यास केलाच नाही अशांकडून दौऱ्याची रक्कम वसूल का करू नये?

First published: May 5, 2017, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading