मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पृथ्वीराज चव्हाण थेट दिल्लीला सोनिया गांधींच्या भेटीला, काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय?

पृथ्वीराज चव्हाण थेट दिल्लीला सोनिया गांधींच्या भेटीला, काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय?

फाईल फोटो

फाईल फोटो

विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनात गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

  • Published by:  Chetan Patil
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी नवी दिल्ली, 26 डिसेंबर : काँग्रेसमधील (Congress) घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरुन अनेक नेत्यांची नावे चर्चेत असताना आज आणखी एक वेगळी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आज थेट दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या दिल्लीतील '10 जनपथ' या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भेट? विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनात गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. येत्या 28 डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार आहे. तसेच 27 डिसेंबरला म्हणजे उद्याच अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. महाविकास आघाडीकडून किमान समान कार्यक्रमानुसार काँग्रेसलाच विधानसभेचा अध्यक्षपद दिलं गेलंय. पण काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या चार मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत आहे. त्यामध्येच पृथ्वीराज चव्हाण यांचंदेखील नाव आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. हेही वाचा : मोठी बातमी! कॅबिनेट मंत्र्याची खुर्ची धोक्यात? काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेच्या चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. पण त्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप पक्षश्रेष्ठींकडून घेतला गेलेला नाही. किंवा निर्णय घेतला गेला असेल तरी जाहीर करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल याबाबत सोनिया गांधी निर्णय घेतील. काँग्रेसकडून उद्यापर्यंत उमेदवार जाहीर केला जाईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यात वाद? दुसरीकडे काँग्रेसमध्ये विविध अंतर्गत हालचाली घडत आहेत. गेल्या काही काळापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. याच वादातून आता नितीन राऊत यांना ऊर्जामंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण या चर्चेतील सर्व दावे खोटे असल्याची भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे. "आमच्या दोघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होतोय. पण मला मंत्री व्हायची वेळ जरी आली तरी मी ऊर्जा खातं कधी घेणार नाही", असं नाना पटोले म्हणाले आहेत. तर दुसरीकडे नितीन राऊत यांची काँग्रेसच्या SC या विभागाच्या अध्यक्षपदावरुन गच्छंती करण्यात आली आहे. नितीन राऊत यांच्याबाबत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. हेही वाचा : Like काका, Like मुलगा, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य जेव्हा महिला पोलीस करते हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू? राज्यातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस मंत्र्यांच्या कामकाजाची यादी मागवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिवेशनानंतर पुढच्या काही दिवसांत मंत्र्यांच्या कामांची यादी घेऊन दिल्लीला जाणार आहेत. तिथे काँग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा करुन मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हेही वाचा : नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला थेट घरचा आहेर, म्हणाले... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. ज्या मंत्र्यांनी समाधानकारक काम केलंय त्यांनाच मंत्रिपदी ठेवलं जाणार आहे. काँग्रेसच्या जवळपास दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सर्व मंत्र्यांच्या कामांची माहिती राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी कोणत्या मंत्र्याला ठेवायचं आणि कुणाला डच्चू द्यायचा याबाबतचा निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार त्या मंत्र्यांच्या कामकाजांवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं देखील वृत्त आहे.
First published:

पुढील बातम्या