मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना डावललं का? प्रीतम मुंडेंनी दिले उत्तर

विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना डावललं का? प्रीतम मुंडेंनी दिले उत्तर

' त्या भागातील लोकप्रतिनिधींना संधी देणं आवश्यक होतं. या सर्व पेड न्यूजच्या गोष्टी आहेत'

' त्या भागातील लोकप्रतिनिधींना संधी देणं आवश्यक होतं. या सर्व पेड न्यूजच्या गोष्टी आहेत'

' त्या भागातील लोकप्रतिनिधींना संधी देणं आवश्यक होतं. या सर्व पेड न्यूजच्या गोष्टी आहेत'

बीड, 23 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीत (mlc elections 2021) भाजपकडून (bjp) 5 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 'या निवडणुकीत पंकजा मुंडेंना (pankaja munde) डावलल्याची चर्चा सुरू आहे. मात्र विधानपरिषद निवडणुका ज्या भागात आहेत, त्या भागातील लोकांना प्रतिनिधित्व मिळावे ही पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे यावेळी मुंडेंना डावललं असं म्हणता येणार नाही', असं स्पष्टीकरण खासदार प्रितम मुंडेंनी (pritam munde) यांनी दिलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत.या सरकारच्या अपयशाबद्दल बोलताना खा. मुंडे यांनी टीकास्त्र सोडले.

'राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण नाकारले गेले. या सर्व प्रकरणाला केंद्र सरकार जबाबदार नाही तर राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे.

यावेळी पत्रकारांनी, भाजपने पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलले का? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, 'ही निवडणूक मराठवाड्यात होत नाहीये, ज्या भागात निवडणूक आहे. त्या भागातील लोकप्रतिनिधी यांना संधी देणं आवश्यक होतं. या सर्व पेड न्यूजच्या गोष्टी आहेत. आधी झालेल्या भाषणाचा नंतर झालेल्या मुलाखतीच्या ही तोडफोड आहे. त्यामुळे मुंडेंना डावललं गेलं नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं

एकता कपूर ते भूमि पेडणेकर कार्तिक आर्यनच्या बर्थडे पार्टीत कलाकारांची हजेरी!

'स्वतःचा दोष झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम राज्य सरकार करते आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप या सरकारने केले आहे. जर दोष सगळे केंद्राचे असेल तर राज्य चालविण्यासाठी केंद्राकडे द्या. महापुरुषणाचे अवमान करण्याचे काम राज्य सरकारने दिले आहे. नाचता येईना अंगण वाकडे असं राज्य सरकारचा काम आहे' अशी टीकाही मुंडे यांनी केली.

'नवीन गाड्या, बंगल्याची डागडुजी करण्यासाठी पैसे आहेत, मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत. रोज सकाळी पत्रकारांसमोर विचार मांडायचे आणि राजकीय टिपण्णी करायची, असं काम या सरकारचं सुरू आहे. समाजातला  कुठलाही वर्ग या सरकारच्या कामगिरीवर खुश नाही. सर्व सामान्य नागरिकांनी या सरकारच्या कामगिरीवर डोळा ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवावी. असं आवाहन देखील यावेळी मुंडेंनी केलं आहे.

सांगलीत आमदार विक्रम सावंत पराभूत, 'करेक्ट' कार्यक्रम केल्याची चर्चा

बीडच्या रेल्वेला राज्य सारकरकडून मदत नाही, केवळ 19 कोटी राज्याने दिले आहेत. केंद्राने भरपूर मदत केली. राज्य सरकारने वाटा दिला तर 2024 पर्यंत रेल्वे येईल, मी मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे, मात्र एकटा लोड केंद्र कसं उचलेल ? सरकार सगळी कडेच कमी पडत आहे. कुठल्याही घटकाला न्याय मिळत नाही. लैंगिक अत्याचाराचा मुद्दा गंभीर आहे. बीड जिल्ह्याची मान खाली जातेय. या सरकारमध्ये दाद कोणाकडे मागायची? हा प्रश्न अनुत्तरित आहे. असंही त्या यावेळी बीड जिल्ह्याच्या कारभरावर बोलतांना म्हणाल्या.

First published: