• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून बेदम मारहाण
  • VIDEO : प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 05:27 PM IST | Updated On: Mar 27, 2019 05:37 PM IST

    बीड, 27 मार्च : भाजपच्या बीडमधील उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत तक्रार नोंदवली म्हणून मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार करणाऱ्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. जिल्हाधिकारी कार्यालयातच ही मारहाण झाली. सुमारे 150 भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असा दादासाहेब मुंडे या तक्रारदाराचा आरोप आहे. फेसबुकवरून त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. प्रीतम यांच्याकडे 2 पॅनकार्ड आहेत. 'प्रीतम गोपीनाथ मुंडे' नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदान यादीत नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याची टीका काही कार्यकर्त्यांनी केली होती. हा हल्ला पंकजा मुंडे पालवे यांच्या सांगण्यावरून झाला असल्याचा आरोप दादासाहेब मुंडेंनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading