मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नव्या नोटांच्या छपाईबद्दल मोठी बातमी, अर्थ मंत्रालय घेणार महत्त्वाचा निर्णय

नव्या नोटांच्या छपाईबद्दल मोठी बातमी, अर्थ मंत्रालय घेणार महत्त्वाचा निर्णय

 19-20 या आर्थिक वर्षात 9900 दशलक्ष नोटा छापण्यात आल्या होत्या. तर मार्च 2021 पर्यंत चलनी नोटांची  दुप्पट छपाई होणार आहे

नाशिक, 07 जून : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आली. लॉकडाउनच्या काळात सर्वच बाजारापेठा, उद्योग धंदे बंद असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्यामुळे आता नाशिकच्या करन्सी नोट प्रेस (CNP) मध्ये चलनी नोटांची छपाई दुपट्ट करण्यात आली आहे.

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी  चलनी नोटांची छपाई वाढवून दुप्पट करण्यात येणार आहे. याबाबत  केंद्रीय वित्त मंत्रालयाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोठा निर्णय मानला जात आहे.

हेही वाचा -...तर तुमच्या घरात कचरा आणून टाकेन, शिवसेना नेत्यानं अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

19-20 या आर्थिक वर्षात 9900 दशलक्ष नोटा छापण्यात आल्या होत्या. तर मार्च 2021 पर्यंत चलनी नोटांची  दुप्पट छपाई होणार आहे.  देवास आणि नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये या नोटा छापण्यात आल्या होत्या.

देवास करन्सी प्रेसमधील 100 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहे.  तर नाशिक करन्सी प्रेसमधील उर्वरीत 50 टक्के कर्मचाऱ्यांना 2 दिवसात कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हेही वाचा -सोनू सूदसाठी भाजप नेता आला धावून, संजय राऊतांवर केला पलटवार

हौशंगाबाद येथील सरकारी कारखान्यातून देवास आणि नाशिकच्या करन्सी प्रेसला लवकरच कागद पुरवठा होणार आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारीच्या काटेकोर उपाययोजना करण्याचे या दोन्ही प्रेसला आदेश देण्यात आले आहे. नवीन करन्सी बाजारात आल्यानं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

First published:

Tags: Nashik