...अन् पुणेकरांसमोर पंतप्रधान मोदींनी जोडले हात, पाहा VIDEO

...अन् पुणेकरांसमोर पंतप्रधान मोदींनी जोडले हात, पाहा VIDEO

पुण्यातील उमेदवारांच्या प्रचार सभेत भाषण सुरू असताना मधेच थांबून पंतप्रधान मोदींनी हात जोडून नमस्कार केला.

  • Share this:

पुणे, 18 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका लावला आहे. गुरुवारी पुण्यात त्यांची सभा पार पडली. या सभेवेळी मोदींनी आपलं भाषण मधेच थांबवून जमलेल्या जनसमुदयासमोर हात जोडले. भाषणात कलम 370 च्या मुद्द्यावर मोदी बोलत होते त्याचवेळी अचानक ते थांबले. पोडियमपासून बाजूला येत त्यांनी लोकांकडे बघून वाकून नमस्कार केला. त्यानी हात जोडल्यानंतर लोकांनी मोदी मोदी अशा घोषणाही दिल्या.

गेल्या 70 वर्षांपासून 'एक देश, एक संविधान' करण्यामध्ये कलम 370 अडथळा ठरत होतं. हे कलम काढून टाकण्याच्या चर्चाही खूप झाल्या पण त्यावर कृती कोणीच केली नाही असे म्हणताना पंतप्रधान मोदी अचानक थांबले. त्यानंतर व्यासपीठावर बाजूला येत त्यांनी हात जोडून नमस्कार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी जवळपास सर्वच ठिकाणी मोदी मोदी अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जातात. त्यावेळी मोदी मधेच भाषण थांबवतात. मात्र, पुण्यात मोदींनी भाषण थांबवून नमस्कार केल्यानं वेगळीच चर्चा रंगली आहे.

पुण्यातील सप महाविद्यालयाच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सांयकाळी ही सभा पार पडली. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, खासदार गिरीष बापट आणि भाजप शहराध्यक्ष माधुरी मिसाळ हे उपस्थित होते.

VIDEO: पवारांच्या वयावरून मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, दिलं 'शोले'चं उदाहरण

Published by: Suraj Yadav
First published: October 18, 2019, 1:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading