खेड, 08 नोव्हेंबर : आपल्या भाषणात एखाद्या राजकीय नेत्यांनी हुबेहूब मिमिक्री करणारे नेते म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) सर्वांना माहित आहेत. मात्र माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भास्कर जाधव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री (narendra modi mimicry) करून चांगलीच टोलेबाजी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये एक कार्यक्रमाला भास्कर जाधव यांनी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलत असताना भास्कर जाधव यांनी महागाई आणि नोटबंदीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत मिमिक्री केली.
'२०१४ साली काँग्रेसने काही केलं आहे का? असं मोदींनी विचारलं आणि लोकंही म्हणाले काही केलं नाही. मग लोकांनी त्यांना मतं दिली. आता त्यांनी विकायला सुरुवात केली. आता लोक म्हणाले राजा विकणं बंद कर, यांच्यापेक्षा काँग्रेस बरे होते, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.
महागाई-महागाई म्हणजे किती असते, आता सिलेंडरचे दर कुठे गेले आहे. उज्ज्वल गॅस योजना आणली, लोकांना वाटलं फुकट देत आहे, त्यामुळे लोकं धावत सुटली पण मोदी सरकारने सबसीडी काढून घेतली, असा टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला.
BREAKING : परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, खंडणी प्रकरणात 2 पोलिसांना अटक
'मोदी यांनी देशाची फसवणूक केली आहे, सगळ्याच पातळीवर मोदी सरकार फेल गेले आहे. गोरगरीब जनतेला दिलेली आश्वासने पाळण्यात ते अपयशी झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
विशेष म्हणजे, भास्कर जाधव नेहमीच आक्रमक भाषणे आणि वादग्रस्थ वक्तव्यांवरून चर्चेत राहिले आहेत. आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्री मुळे त्यांच एक वेगळं रूप देखील समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.