नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत मुक्कामी आहे. रात्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आज एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहे. शिंदे यांनी रात्रीचा मुंबई दौरा रद्द करून ते दिल्लीतच थांबले होते. रात्री उशिरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तर आज दुपारी दीड वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोबतच दिल्लीमध्ये काही केंद्रीय मंत्र्यांची देखील ते भेट घेणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे.
(भाजपचा शिवसेनेसह, शिंदे गटाला धक्का! फडणवीसांच्या उपस्थितीत 2 बड्या नेत्यांचा प्रवेश)
दरम्यान, महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेले. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनातून थेट अमित शहा यांच्या घरी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. अमित शाह हे लवकरच मुंबईचा दौरा करणार असल्याचंही सांगतिलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.