परतीच्या पावसामुळे नाशिकच्या बाजारपेठेत भाज्या महागल्या

परतीच्या पावसामुळे नाशिकच्या बाजारपेठेत भाज्या महागल्या

नाशिकच्या बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

  • Share this:

नाशिक,28 ऑक्टोबर: परतीचा पाऊस जरी परतला असला तरी पावसानं झालेल्या नुकसानाचा फटका हा आता जाणवायला लागलाय. नाशिकच्या बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

नियमित होणाऱ्या उत्पादनात पावसामुळं घट झाल्यानं नाशिक बाजार समीतीत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. याचा फटका आता थेट मुंबईला बसायला सुरुवात झाली आहे. कारण नाशिक बाजार समितीतून मुंबईला सगळ्यात जास्त पुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी पुण्यातील मंडईतीही भाज्या अशाचप्रकारे महागल्या होत्या.तसंच नवी मुंबईतही भाज्या महागल्यामुळे ग्राहकांना महागाईचे चटके सोसावे लागले होते. परतीच्या पावसानं या भावात आणखी वाढच होण्याची शक्यता आहे. एकीकडे परतीच्या पावसानं शेतकरी हैराण झाला आहे. तर दुसरीकडे भाववाढीनं ग्राहकही चितेंत आहे.

First published: October 28, 2017, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading