Home /News /maharashtra /

लग्नासाठी तरुणाची हद्द पार; PSI असल्याचं सांगत टाकलं जाळं, फासा पलटला अन्...

लग्नासाठी तरुणाची हद्द पार; PSI असल्याचं सांगत टाकलं जाळं, फासा पलटला अन्...

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Solapur: लग्न करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग‌‌ बांधून तयार असलेले तरुण लग्नाळू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी कधी काय करतील याचं काहीही सांगता येत नाही. सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा (Mangalwedha) येथील एका तरुणानं तर लग्नासाठी हद्दच पार केली आहे.

पुढे वाचा ...
मंगळवेढा, 18 मार्च: लग्न करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग‌‌ बांधून तयार असलेले तरुण लग्नाळू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी कधी काय करतील याचं काहीही सांगता येत नाही. सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या मंगळवेढा (Mangalwedha) येथील एका तरुणानं तर लग्नासाठी हद्दच पार केली आहे. आरोपीनं आपण पीएसआय असल्याचं सांगत (pretend as police officer to marry young woman) एका तरुणीकडे तगादा लावला होता. तसेच आपले वडील आयपीएस असल्याचंही त्यानं तरुणीला भासवलं होतं. काही काळ तरुणीलाही आरोपीवर विश्वास बसला होता. पण संशय येताच आरोपीचा बनाव उघड झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तोतयागिरी करणाऱ्या पीएसआयला अटक (fake PSI arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. रमेश भोसले असं तोतयागिरी करणाऱ्या या भामट्याचं नाव आहे. तो सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा येथील रहिवासी आहे. आरोपी भामट्यानं आपण पीएसआय आणि वडील आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून पंढरपुरातील एका तरुणीला लग्नासाठी जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणीच्या आणि तिच्या नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे तोतया पीएसआय रमेश भोसलेचा हा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. हेही वाचा-मुंबईत तुंबळ हाणामारी, कॉलेजच्या गेटवर 12वीच्या विद्यार्थ्याला मारहाण,LIVE VIDEO पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपुरातील एक तरुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती. यादरम्यान तिची आरोपी रमेश भोसले याच्याशी ओळख झाली. या ओळखीनंतर आरोपी भामट्यानं तरुणीशी आणि तिच्या आई वडिलांशी सलगी वाढवली. मी पीएसआय असून मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचं खोटी माहिती आरोपीनं पीडितेच्या आई वडिलांना दिली. तरुणीने देखील काही दिवस त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यातून त्यानं पिडीत तरुणीशी अधिक जवळीक वाढवत पीडितेच्या नातेवाईकांकडे लग्नासाठी तगादा लावला. हेही वाचा-सोबत जगता येत नव्हतं म्हणून मरण्याचा केला इरादा, नियतीनं इथेही केली ताटातूट दरम्यान तरुणीला आरोपीवर संशय आल्यानं तिनं व तिच्या आई वडिलांनी मंगळवेढा आणि पंढरपूर पोलीस ठाण्यात याबाबत चौकशी केली. तेव्हा या नावाचा कोणीही पोलीस अधिकारी नसल्याचं समोर आलं. त्यानंतर पीडित तरुणीनं निर्भया पथकाला याची माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून आरोपी रमेश भोसलेला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून पोलीस दलाचा खाकी गणवेश, टोपी, बेल्ट आणि मुंबई पोलीस नावाने तयार केलेले बनावट ओळखपत्र असा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Marriage, Solapur

पुढील बातम्या