मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ईदगाह मैदानावरची सभा म्हणजे 'राष्ट्रद्रोह' असं म्हणणाऱ्या हिंदू राष्ट्रसेनेच्या अध्यक्षाला अटक

ईदगाह मैदानावरची सभा म्हणजे 'राष्ट्रद्रोह' असं म्हणणाऱ्या हिंदू राष्ट्रसेनेच्या अध्यक्षाला अटक

हिंदू राष्ट्र सेनेने नगरमध्ये ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला विरोध केला आहे.

हिंदू राष्ट्र सेनेने नगरमध्ये ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला विरोध केला आहे.

हिंदू राष्ट्र सेनेने नगरमध्ये ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला विरोध केला आहे.

अहमदनगर,20 जानेवारी: हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांना नगर शहर पोलिसांनी अटक केली आहे. हिंदू राष्ट्र सेनेने नगरमध्ये ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला विरोध केला आहे. नगरमध्ये ईदगाह मैदानावर सीएए आणि एनसीआर कायद्याविरोधात राज्यस्तरीय निषेध सभा होणार आहे. ही सभा म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, असा आरोप करत धनंजय देसाई यांना या सभेला विरोध केला होता. सभास्थळी जाण्याचाही धनंजय देसाई यांनी इशारा दिला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी देसाई यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून ताब्यात घेतले. धनंजय देसाई सोमवारी नगरमध्ये आहेत. त्यांनी ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला विरोध करत जिल्हाधिकारी यांच्याकडे रॅलीली परवानगी मागितली होती. तोफखाना पोलिसांनी ही परवानगी नाकारली होती. नंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी कोतवाली पोलिसांनी त्यांना अटक घेतले. दुष्काळाच्या काळात टँकर घोटाळा, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर घोटाळा झाला आहे. तर चारा छावण्यातही घोटाळा झाला असून तत्कालीन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली त्यातही घोटाळा झाल्याचा घणाघाती आरोप कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. आमदार पवार जिल्हा नियोजन बैठकीत बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रथमच नगरला आले होते. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनाची बैठक झाली. या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी तत्कालीन भाजप सरकारवर घणाघाती आरोप केले. अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा या विषयावर मोठा निधी मागितला आहे. या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी दुष्काळाच्या काळात जिल्ह्यामध्ये टँकर छावणी आणि दिलीप पवार योजनेअंतर्गत झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादीच्या बैठकीत नवीन सदस्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने जलयुक्त शिवार, टँकर घोटाळा आणि चारा छावण्या या तिन्ही विषयांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तो शासनाला पाठवण्यात येईल, याची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
First published:

Tags: 6 police, Arrested, Hindu rashta sena, Maharashtra news

पुढील बातम्या