अस्मितादर्श चळवळीचे जनक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

अस्मितादर्श चळवळीचे जनक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांचं निधन झालं आहे. ते 81 वर्षांचे होते. पानतावणे म्हणजे दलित साहित्याचे जनक अशी त्यांची ख्याती होती.

  • Share this:

27 मार्च : ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांचं निधन झालं आहे. ते 81 वर्षांचे होते. पानतावणे म्हणजे दलित साहित्याचे जनक अशी त्यांची ख्याती होती. त्यांना याचवर्षी सरकारनं पद्मश्री जाहीर करून त्यांचा गौरव केला होता. पण त्यांच्या अशा जाण्याने साहित्य क्षेत्राचं मोठं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही.

डॉ. पानतावणे हे अस्मितादर्श चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. लेखन करण्यासोबतच ते समीक्षक आणि संपादकही होते. त्यांचा अनुभव आणि त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्यांनी त्यांच्या विचारांनी नेहमीच सगळ्यांना प्रेरित केलं.

डॉ. गंगाधर पानतावणे हे मूळचे नागपूरचे होते. 1963मध्ये ते औरंगाहादमध्ये स्थायिक झाले. तिथल्या मिलिंग कॉलेजमध्ये त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. औरंगाबादमध्येच त्यांनी साहित्य चळवळ सुरू केली, ज्याला तरुण आणि विचारवंतांचा मोठा पाठिंबा मिळाला.

अस्मितादर्श ते गेल्या 50 वर्षांपासून संपादक होते. 'दलित साहित्याने अंधार नाकारला आहे, कलंकित भूतकाळ नाकारला आहे. मानसिक गुलामगिरीतून दलित मुक्त होऊ पाहत आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत,' अशा शब्दांत दलित साहित्याची पाठराखण करणाऱ्या पानतावणे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांची मोठी फळी घडवली.

डॉ. गंगाधर पानतावणे यांची माहिती

- डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत आहेत.

- हे दलित साहित्य व दलित चळवळीतील अस्मितादर्श या महत्वाच्या त्रैमासिकाचे प्रकाशन करतात. त्यांनी दलित लेखक-वाचक मेळावा भरवला.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराज यांच्या विचारधरेला धरून लिखाण केले आहे.

- मराठी भाषेतील त्यांच्या या योगदानाला महाराष्ट्र सरकार आणि अनेक साहित्यिक संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळील बौद्ध लेण्यांवरील विशेष यात्रेची सुरुवात केली.

- सद्यस्थितीतील त्यांचे वास्तव्य औरंगाबाद येथे आहे

First published: March 27, 2018, 8:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading