मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खळबळजनक ! बेडवर गर्भवती महिलेचा मृतदेह तर शेजारी पतीचा गळफास, नव दाम्पत्याची हत्या की आत्महत्या?

खळबळजनक ! बेडवर गर्भवती महिलेचा मृतदेह तर शेजारी पतीचा गळफास, नव दाम्पत्याची हत्या की आत्महत्या?

बेडवर गर्भवती महिलेचा मृतदेह तर शेजारी पतीचा गळफास, नव दाम्पत्याची हत्या की आत्महत्या?

बेडवर गर्भवती महिलेचा मृतदेह तर शेजारी पतीचा गळफास, नव दाम्पत्याची हत्या की आत्महत्या?

husband wife found dead in home: गर्भवती महिला आणि तिचा पती मृतावस्थेत आढळून आले आहेत. बीडमधील या घटनेने खळबळ उडाली आहे.

बीड, 17 डिसेंबर : एका बंद खोलीत पती आणि पत्नीचा मृतदेह आढळून (Husband and wife found dead in Home) आला आहे. बीडमधील वैतागवाडी (Vaitagwadi Beed) येथे ही घटना घडली आहे. या दाम्पत्याचं लग्न एक वर्षांपूर्वी झालं होतं. मृतक महिला ही आठ महिन्यांची गर्भवती (8 month pregnant) होती. गर्भवती महिला बेडवर मृतावस्थेत आढळून आली आहे तर तिचा पती शेजारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या दोघांचा मृतदेह घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांची हत्या झाली आहे की, आत्महत्या केली आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत. (newly married couple found dead in house)

मृतक व्यक्तीचं नाव राजेश भालचंद्र जगदाळे असे आहे तर महिलेचं नाव दीपाली राजेश जगदाळे आहे. राजेश हा 26 वर्षांचा होता तर दीपाली 24 वर्षीय होती. दोघांचाही विवाह एक वर्षांपूर्वी झाला होता. नेकनुर पासून पाच किलोमीटर अंतरावर वैतागवाडी येथे हे दाम्पत्य राहत होते. 16 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास नेकनूर पोलीस स्टेशनला एका व्यक्तीने ही घटना घडल्याचं फोन करुन सांगितलं. त्यानंतर पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली.

वाचा : 8 वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार, घटनेनंतर 100 रुपये देऊन कुणालाही न सांगण्याची दिली धमकी

पोलीस घटनास्थळी दाखळ झाले असता त्यांना राजेश भालचंद्र जगदाळे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर त्याची पत्नी दीपाली ही बेडवर मृतावस्थेत पडल्याचं दिसून आलं. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दीपाली ही आठ महिन्यांची गरोदर होती. या दाम्पत्याचा संसार खूपच चांगला आणि आनंदात सुरू होता मात्र, अचानक दोघांचे घरात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे दाम्पत्य शेतकरी कुटुंबातील आहे. राजेश आणि दीपाली या दोघांचे आई-वडील शेती करतात. दरम्यान या दोघांची हत्या आहे की, आत्महत्या याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.

पत्नीने तंबाखू दिली नाही म्हणून डोळ्यात घातलं जळतं लाकूड

नशेत असलेल्या पतीनं पत्नीकडे तंबाखू मागितली; मात्र पत्नीने तंबाखू न दिल्यानं पतीने रागाच्या भरात पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना झारखंडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात घडली आहे. मैनपूर पोलिसांनी या प्रकरणी पतीला अटक केली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

मैनपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी हर्षवर्धन बैस यांनी सांगितलं, फूलसिंह नेताम असं आरोपीचं नाव असून, घटना घडली त्या वेळी तो नशेत होता. त्याने त्याची पत्नी रमुलाबाई हिच्याकडे तंबाखू मागितला. तिने तंबाखू देण्यास नकार दिल्यानं चिडलेल्या फूलसिंह नेतामनं स्वयंपाकघरातल्या चुलीतलं जळतं लाकूड तिच्या डोक्यात मारलं. या हल्ल्यात रमुलाबाईच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यानंतरही फूलसिंह याचा राग शांत झाला नाही. त्यामुळे त्यानं रागाच्या भरात चुलीतून दुसरं जळतं लाकूड काढून ते रमुलाबाईच्या डोळ्यात घातलं. यात रमुलाबाईचा जागीच मृत्यू झाला.

First published:

Tags: Beed, Crime