संघाच्या प्रतिनिधी सभेचा आज शेवटचा दिवस, संध्याकाळी तोगडिया करणार गौप्यस्फोट

संघाच्या प्रतिनिधी सभेचा आज शेवटचा दिवस, संध्याकाळी तोगडिया करणार गौप्यस्फोट

तोगडिया आणि अमित शहांमधले वाद जगजाहीर आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत ते कुणावर आणि काय आरोप करतात, ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

  • Share this:

11 मार्च : नागपूरमध्ये संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची आजचा शेवटचा दिवस आहे. सरकार्यवाह भैयाजी जोशी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. तर विहिंपचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. तोगडिया आणि अमित शहांमधले वाद जगजाहीर आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत ते कुणावर आणि काय आरोप करतात, ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

गेल्या तीन दिवसांपासून १५०० प्रतिनिधी रेशिमबागेतील हेडगेवार स्मारक समितीच्या परिसरात निवासी आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा , विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया उपस्थित आहेत.

भाजप आणि विश्व हिंदू परिषद या दोन्ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या संघटना आहे. दोन्ही संघटनांची मातृशाखा म्हणून संघ मार्गदर्शकाच्या भूमिकेत असते. पण गेल्या काही दिवसांत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, यांच्यात फारसे चांगले संबंध नसल्याचं दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी 'माझ्या जीवाला धोका आहे' असं म्हणत प्रवीण तोगडिया यांचा रोष कुणावर होता, हे अवघ्या देशाला माहीत आहे.

आता संघाच्या नागपुरात सुरु असलेल्या प्रतिनिधी सभेत हे दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेच्या निमित्तानं विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया, आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एकत्र आले आहे. गेल्या काही महिन्यात विहिंप आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी संघाची काय भूमिका असेल, याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

First published: March 11, 2018, 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading