शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी आंदोलन करणार-प्रवीण तोगडिया

शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी आंदोलन करणार-प्रवीण तोगडिया

"आता चर्चा नको युद्ध करा, बंदूक कश्यासाठी आहे. किती दिवस सैनिक शहीद होणार, किती दिवस नुसती भाषणं करणार त्यामुळे आता थेट युद्ध हवं"

  • Share this:

10 फेब्रुवारी :  आता चर्चा नको युद्ध करा, बंदूक कश्यासाठी आहे. किती दिवस सैनिक शहीद होणार, किती दिवस नुसती भाषणं करणार त्यामुळे आता थेट युद्ध हवं असं विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी उपस्थित केलाय. तसंच हमीभावासाठी आंदोलन करणार अशी घोषणाही तोगडियांनी केली.

गावांमध्ये कर्जामुळे शेतकरी मारतोय तर दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानच्या गोळीमुळे सैनिक मरत आहेत. मात्र आता चर्चा नको आता थेट युद्ध करायला पाहिजे. बंदूक कश्यासाठी आहे. किती दिवस मरत राहणार, किती दिवस नुसती भाषणं करणार त्यामुळे आता थेट युद्ध हवं असं मत प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केलं.

त्याआधी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे आज प्रवीण तोगडिया यांनी दत्तमहाराजांचे दर्शन घेतले यावेळीही त्यांनी बोलताना पाकिस्तानवर निशाणा साधलाय. आर्मीवर होणाऱ्या हल्यामागे रोहींग्या मुस्लिमांचा हात आहे, त्यांच्या मदतीमुळे हल्ले करण्यास सोपं असून आता बोलणं नव्हे तर पाकिस्तान विरुद्ध युद्ध हाच पर्याय असल्याचं प्रविण तोगडिया यांनी म्हटलंय. आता मेहबूबा सरकारला बडतर्फ करून पाकिस्तानला बंदुकीने उत्तर देण्याची वेळ आल्याचंही त्यांनी म्हटलंय.

शेतकऱ्यांना दीड पट हमीभाव द्यायला हवा आत्तापर्यंतच्या सर्व सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जदार बनलाय मी लवकरच हमीभाव मिळण्यासाठी आंदोलन सुरू करणार असल्याचा इशाराही प्रविण तोगडिया यांनी दिलाय.

First published: February 10, 2018, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading