• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Jan Ashirwad Yatra: भाजप नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने प्रविण दरेकर संतापले आणि म्हणाले...

Jan Ashirwad Yatra: भाजप नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने प्रविण दरेकर संतापले आणि म्हणाले...

कर्मचा-यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे आणि त्याचे श्रेय ही घ्यावे असा खोचक टोला विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यां?

  • Share this:
ठाणे, 18 ऑगस्ट : सध्या भाजपाच्या जन आशीवार्द यात्रेवरुन (Jan Ashirwad Yatra) भाजपा आणि सेनेत चांगलीच जुंपली (BJP vs Shiv Sena) असल्याचं पहायला मिळत आहे. असे असताना आता भाजपाचे विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी जन आशीवार्द यात्रा आयोजक (Jan ashirwad yatra orgnaiser)  आणि भाजपा नगरसेवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यावरुन सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. अजित पवार हजारोंच्या गर्दीत कार्यालयाचे उद्घाटन करतात, शिवसेना हजारोंचे मेळावे घेतात यावेळेस पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पण भाजपाच्या जन आशीवार्द यात्रेला लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून सत्ताधारी जाणीवपुर्वक आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत अता थेट आरोप सरकारवर केलाय. हिम्मंत असेल तर उद्घाटन करणारे आणि मेळावे घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन दाखवा असही यावेळेस प्रविण दरेकर म्हणाले. नाशिक शिकाऊ डॉक्टर आत्महत्या प्रकरण, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश श्रेय घ्या पण त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या ठाण्यात ग्लोबल हाॅस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याने कर्मचारी हाॅस्पिटल बाहेर आंदोलन करत आहेत. या ठिकाणी प्रविण दरेकर यांनी भेट दिली आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जर येत्या दोन दिवसात ठाणे महानगरपालिकेने या कर्मचाऱ्यांना सामावून घेतले नाही तर भाजपा उग्र आंदोलन करेल आणि ग्लोबल हाॅस्पिटल बंद पाडेल असा इशाराही यावेळेस प्रविण दरेकर यांनी दिलाय. तर कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे आणि त्याचे श्रेय ही घ्यावे असा खोचक टोला विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ही लगावला आहे. गेल्याच महिन्यात ग्लोबल हाॅस्पिटलने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले होते, तेव्हा प्रसार माध्यमांनी दाखवलेल्या बातम्यांमुळे त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. मात्र आता पुन्हा त्यांना सेवेतून काढण्यात आले आहे. खरं तर ठाणे महानगरपालिकेचे ग्लोबल कोविड हाॅस्पिटल हे सुरुवाती पासूनच वादात आहे. कधी बेडसाठी पैसे घेतल्याप्रकरणी, कधी नियम धाब्यावर बसवून सेलिब्रिटींना लस दिल्या प्रकरणी तर कधी मनमानी कारभारामुळे पण असं असून सुद्धा ठाणे महानगरपालिका काहीच कारवाई करत नाहीये कारण या ग्लोबल हाॅस्पिटलवर थेट मंत्र्यांचा हात आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही अशी चर्चा सध्या ठाण्यात आहे.
Published by:Sunil Desale
First published: