अमरावती, 17 जुलै- माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव माजी आमदार रावसाहेब शेखावत बहुजन वंचित आघाडीच्या वाटेवर आहेत. मंगळवारी रावसाहेब शेखावत यांनी मुंबईत बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या वृत्ताला खुद्द रावसाहेब शेखावत यांनी दुजोरा दिला आहे. रावसाहेब शेखावत वंचित आघाडीच्या तिकिटावर अमरावतीमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच शेखावत यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रावसाहेब शेखावत आणि यशोमती ठाकूर यांच्यातील मतभेद..
अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि रावसाहेब शेखावत यांच्यातील मतभेद आहेत. रावसाहेब शेखावत आणि भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्यामधील कथित संभाषण काही महिन्यांपूर्वी 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागले होते. यशोमती यांना पराभूत करण्यासाठी पक्षातूनच लॉबिंग होत आहे, हे या संभाषणातून समोर आले होते.
काँग्रेसमधील नेते आपल्याच पक्षातील उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजप नेत्यांसोबत चर्चा करत आहेत. या फोन रेकार्डिंगमुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली होती. निवडणुकीत येणाऱ्या पाच कोटी रूपयांच्या खर्चावरही फोनवर चर्चा झाली. यशोमती ह्या गेल्या 2 विधानसभा निवडणुकीपासून तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार आहेत. निवडणूक खर्चासाठी पाच कोटींची तयारी असल्याची चर्चाही फोन संभाषणादरम्यान झाली आहे. मात्र, रावसाहेब शेखावत यांनी या रेकॉर्डिंग मधला आवाज आपला नाही, असा दावा केला होता.
VIDEO : रिक्षातून बाहेर खेचून पत्नीने पतीला भररस्त्यावर बेदम धुतले