Home /News /maharashtra /

'25 दिन में डब्बल' चे आमिष देऊन भावी आमदाराने लाखो रुपयांना फसवले, पंढरपुरात खळबळ

'25 दिन में डब्बल' चे आमिष देऊन भावी आमदाराने लाखो रुपयांना फसवले, पंढरपुरात खळबळ

 सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये शेअर मार्केटमध्ये फाटे फसवणूक प्रकरण ताजे असताना आता पंढरपूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये शेअर मार्केटमध्ये फाटे फसवणूक प्रकरण ताजे असताना आता पंढरपूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये शेअर मार्केटमध्ये फाटे फसवणूक प्रकरण ताजे असताना आता पंढरपूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला

पंढरपूर,  09 फेब्रुवारी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये शेअर मार्केटमध्ये फाटे फसवणूक प्रकरण ताजे असताना आता पंढरपूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे.  15 लाखांचे 30 लाख असे डबल पैसे करून देतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेचे ( Sankalp Nagari Sahakari Patsanstha) अध्यक्ष प्रथमेश कट्टे (Prathamesh Katte) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी 5 लोकांची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रथमेश कट्टे यांच्याविरोधात एका व्यक्तीने गुन्हा दाखल केला असून यामुळे पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवींची रक्कम मिळत नाही, असा तक्रारी अर्ज घेऊन प्रथमेश कट्टे याच्याविरोधात आणखी पाचजण पुढे आले आहेत. सुनील भिसे (वय ३५, रा. अंबाबाई पटांगण झोपडपट्टी, अंबिकानगर, सध्या अक्षत बंगलोज सोसायटी, कॉलेज चौक, पंढरपूर) यांना शेतजमीन घ्यायची होती. त्यांना शेतजमीन घेण्यासाठी 15 लाखांचे 30 लाख रुपये करून देतो असे सांगून प्रथमेश कट्टे व शुभम कोरके यांनी फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्याची चौकशी करून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर प्रथमेश कट्टे अध्यक्ष असलेल्या संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेमध्येही लोकांनी ठेवी ठेवल्या आहेत. परंतु, त्यांची रक्कम परत मिळत नसल्याबाबत पाचजणांनी शहर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे. बार्शीच्या फाटे प्रकरणानंतर पंढरपूर मधील प्रथमेश कट्टे प्रकरण उघडकीस आले आहे. उंची राहणीमान, महागड्या गाड्यांचा वापर करून पैसे डबल करुन देतो म्हणत लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर भावी आमदार असलेले कट्टे सध्या फरार झाला असून संकल्प पतसंस्थेत ठेवी ठेवणाऱ्या ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या