Home /News /maharashtra /

मोठी बातमी, प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात

मोठी बातमी, प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात

ईडीच्या पथकाने सकाळी सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर घरातील सदस्यांची प्राथमिक चौकशी केली.

    ठाणे, 24 नोव्हेंबर : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. त्यांच्या 10 पेक्षा जास्त ठिकाणांवर ईडीने कारवाई सुरू केली. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक ( vihang sarnaik) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीच्या पथकाने सकाळी सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर घरातील सदस्यांची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर आता विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील निवास्थानी आज सकाळी ईडीने धाड टाकली. आमदार प्रताप सरनाईक यांचे दोन्ही चिरंजीव विहंग आणि पुर्वेश यांच्या घरी आणि प्रताप सरनाईक यांच्या व्यावसायिक कार्यालयावरही ईडीने धाड टाकली. या संदर्भात ईडीने कोणतीही नोटीस दिली नसल्याचं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितले आहे. सध्या प्रताप सरनाईक हे मुंबई बाहेर आहेत. त्यांच्या मालकीच्या 10 विविध जागांवर या धाडी टाकल्याचं ईडीकडून सांगितलं जात आहे. संजय राऊत भाजपवर भडकले 'केंदीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल असं कुणाला वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. CBI, ED काही असू द्या, आम्ही सर्व कुणालाही शरण जाणार नाहीत. लढत राहू हे सरकार पुढे 25 वर्षे कायम राहील. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. त्यांनी लक्षात घ्यावे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, कितीही धाडे दाखल करा, खोटे पुरावे द्या, पण विजय हा सत्याचाच होत असतो' असं राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितले. 'तपास संस्थांचा वापर करून सरकारवर दबाव आणू इच्छित आहे. आमदारांचा विश्वास तोडू पाहत आहे. पण, त्यांनी हे लक्षात आणावे हा शिवरायांचा आमदार आहे. आता ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुमचे सरकार येणार नाही. तुम्ही सुरुवात केली आम्हाला शेवट कसा करायचा हे चांगले माहिती आहे. ईडीने आमच्या आमदारांच्या खासदारांसमोर ईडीने कार्यालय थाटले तरी काही फरक पडणार नाही' असंही राऊत म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या