मोदींचा किंगमेकर 'मातोश्री'वर, युतीची चर्चा की शिवसेनेचं कॅम्पेन?

मोदींचा किंगमेकर 'मातोश्री'वर, युतीची चर्चा की शिवसेनेचं कॅम्पेन?

महाराष्ट्रात युतीचा निर्माण झालेला पेच आणि जागावाटपाचा क्लिष्ट मुद्दा सोडविण्यासाठी खास दूत म्हणूनही प्रशांत किशोर यांनी उद्धव यांची भेट घेतल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 05 फेब्रुवारी : भारताचे यशस्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.  प्रशांत किशोर यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर शिवसेनेत्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत किशोर यांची 'आयपॅक' ही कंपनी शिवसेनेच्या प्रचाराची दिशा ठरविण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर दुसरी शक्यता अशीही व्यक्त करण्यात येत आहे की महाराष्ट्रात युतीचा निर्माण झालेला पेच आणि जागावाटपाचा क्लिष्ट मुद्दा सोडविण्यासाठी खास दूत म्हणूनही प्रशांत किशोर यांनी उद्धव यांची भेट घेतल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. असे प्रश्न सोडविण्यात किशोर तज्ज्ञ समजले जातात.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी करण्यात आणि जागावाटप करण्यात प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका होती. काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी अमित शहांच्या सांगण्यावरूनच प्रशांत किशोर यांना जेडीयूमध्ये घेतल्याचं सांगितलं होतं.

त्याचबरोबर किशोर हे आता जेडीयूमध्ये पदाधिकारी आहेत. त्यामुळे ते थेटपणे शिवसेनेच्या प्रचाराच्या कामाची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर येण्याची शक्यता कमीच आहे असंही बोललंय जातंय. त्यामुळे या भेटीत नेमकं काय झालं हे गुलदस्त्यातच आहे.

2019च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचं प्रचाराचं शिवधनुष्य प्रशांत किशोर यांच्या हाती दिलं जाण्याची चर्चा सध्या रंगत आहे. त्यामुळे शिवसेनेचं हे ऐतिहासिक निवडणूक प्लॅनिंग असेल असं म्हणायला हरकत नाही.

कोण हे प्रशांत किशोर?

-  भाजपच्या 2014च्या ऐतिहासिक निवडणूकीच्या प्रचाराची दिशा ठरवविण्याचं काम.

- जनतेचं मन जिंकणारं निवडणुक कॅम्पेन डिझाईन

- चाय पे चर्चा, थ्रीडी रॅली, रन फॉर युनिटी, मंथन आणि सोशल मीडिया कार्यक्रमांचं नियोजन

- नितीशकुमार यांच्यासाठी 2015च्या बिहार विधानसभा निवडणूकीचं कॅम्पेन

-- 'नितीश के निश्चय, विकास की गॅरेंटी' स्लोगनसह सायकलवरून कॅम्पेन

- 2017 - पंजाब विधानसभा निवडणूक कॅम्पेन

- 2017 - उत्तर प्रदेश विधानसभा  निवडणूक कॅम्पेन

मोदींचा किंगमेकर मातोश्रीवर, युतीची चर्चा की शिवसेनेचं कॅम्पेन?

First published: February 5, 2019, 4:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading