विधानसभेची अटीतटीची लढत, प्रणिती शिंदे यांचा सोलापूरमध्ये विजय

विधानसभेची अटीतटीची लढत, प्रणिती शिंदे यांचा सोलापूरमध्ये विजय

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांचा विजय झालाय. त्या सलग तिसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत.

  • Share this:

सोलापूर, 24 ऑक्टोबर : सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांचा विजय झालाय. शिवसेनेचे दिलीप माने, अपक्ष महेश कोठे, MIM कडून फारुक शाब्दी आणि प्रणिती शिंदे या चारही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती. यामुळे प्रणिती शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण अखेर या शर्यतीत त्यांनी बाजी मारली.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे आमदार झाल्या. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेतही त्या निवडून आल्या आणि आता पुन्हा एकदा त्यांनी विजय मिळवला आहे.

प्रणिती शिंदे यांच्याबरोबर अमित देशमुख, धीरज देशमुख हे काँग्रेसचे तरुण नेतेही या निवडणुकीत विजयी झाले.धीरज देशमुखांना पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवण्यात यश आलं.

(हेही वाचा : साताऱ्यात उदयनराजेंना धक्का, उदयनराजेंची 'या' आमदारानं कॉपी केली स्टाईल)

पवार कुटुंबातले रोहित पवार यांनी जलसंधारणमंत्री राम शिंदेंचा पराभव केला. रोहित पवार यांनी मागील पाच वर्षांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघात मोर्चेबांधणी केली. साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला. युवकांमध्ये लोकप्रिय झालेल्या रोहित पवार यांनी अखेर बाजी मारली. यावेळी विधानसभेत मोठ्या संख्येनं तरुण चेहरे पोहोचल्यानं विधानसभेच्या कामकाजात तरूणांची छाप पाहायला मिळेल. तसंच यंग जनरेशनमुळे नव्या आयडियाही पाहायला मिळणार हे नक्की.

=============================================================================================

LIVE VIDEO : शरद पवारांनी उदयनराजेंना घेतलं फैलावर, म्हणाले...

Published by: Arti Kulkarni
First published: October 24, 2019, 4:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading