Home /News /maharashtra /

प्रणिती शिंदे या कॅबिनेट मंत्री होतील, काँग्रेस मंत्र्यांचं सूचक विधान

प्रणिती शिंदे या कॅबिनेट मंत्री होतील, काँग्रेस मंत्र्यांचं सूचक विधान

'देर आये दुरूस्त आये, असं म्हटलं जातं. सबर का फल मिठा होता हैं, सोलापूरकरांना याचं फळ नक्की भेटलं'

'देर आये दुरूस्त आये, असं म्हटलं जातं. सबर का फल मिठा होता हैं, सोलापूरकरांना याचं फळ नक्की भेटलं'

'देर आये दुरूस्त आये, असं म्हटलं जातं. सबर का फल मिठा होता हैं, सोलापूरकरांना याचं फळ नक्की भेटलं'

सोलापूर, 18 सप्टेंबर : काँग्रेसचे (congress) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना महाविकास आघाडी सरकार (mva government) स्थापन झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाले नव्हते त्यामुळे त्या काही काळ नाराज होत्या. अलीकडे काँग्रेसने त्यांच्यावर नवी जबाबदारीही सोपवली. पण, आता खूद्द काँग्रेसचे (congress) नेते आणि राज्याचे राज्यकृषी मंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी 'प्रणिती शिंदे या भविष्यात राज्य मंत्री नाहीतर कॅबिनेट मंत्री होतील', असं सूचक विधान केलं आहे. आज सोलापूरमध्ये काँग्रेसचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला विश्वजीत कदम आणि आमदार प्रणिती शिंदे हजर होत्या. यावेळी बोलत असताना विश्वजीत कदम यांनी शिंदे समर्थकांनी मनं जिंकली. 'काँग्रेस पक्षाने आज संपूर्ण महिला कार्यकर्त्यांचा सन्मान राखत त्यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. खरंतर त्या आमच्यासोबत असल्या तर मनापासून आनंद झाला असता. पण, कदाचित येणाऱ्या काळात त्या राज्यमंत्री नव्हे तर कॅबिनेट मंत्री होतील, याबद्दल मला आश्चर्य वाटणार नाही. कधी कधी देर आये दुरूस्त आये, असं म्हटलं जातं. सबर का फल मिठा होता हैं, सोलापूरकरांना याचं फळ नक्की भेटलं', असं विधान कदम यांनी केलं. आजपर्यंत इतिहासात जे घडलं नाही ते हळूहळू महाराष्ट्रात घडलं. ग्रामीण भागात एक म्हण असते, त्या प्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या अंगात आल्यामुळेच ही महाविकास आघाडी झाली जन्माला आली' असं म्हणताच विश्वजीत कदम यांच्या या विधानाने सभागृहात एकच हश्शा पिकली. 'सोलापूरमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामाला लागले पाहिजे. धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या वडिलांचा वारसा चांगल्या प्रकारे जोपासला. आता त्यांच्यावरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एका नाण्याच्या दोन बाजू असतात. मी 15-20 वर्षांपासून ओळखतो, या भागात कशा प्रकारे काम करायचं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, ठोसाला ठोसा देऊन काम करायचे आहे, ऐवढी ताकद नक्कीच तुमच्या आहे, असं म्हणत कदम यांनी मोहिते पाटलांचं कौतुक केलं. जिल्हा परिषद, मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका असतील, यासाठी आपल्याला जोमाने कामाला लागावे लागणार आहे. सोलापूर जिल्हा हा विश्वाजीत कदमाचं दुसरं घरं आहे असं समजता, त्यामुळे कार्यकर्त्यांनी नुसती हाक द्यावी, असंही कदम यावेळी म्हणाले.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या