संघाच्या कार्यक्रमात उद्या मुखर्जींचं भाषण

संघाच्या कार्यक्रमात उद्या मुखर्जींचं भाषण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम उद्या सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपुरात पोहोचणार आहेत.

  • Share this:

 नागपूर, 06 जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपुरात पोहोचणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता त्यांचे नागपुरात आगमन होईल. तेथून ते राजभवनात जातील, तेथेच त्यांचा मुक्काम राहील. 7 जूनला होणाऱ्या कार्यक्रमासाठी सायंकाळी 6 वाजता ते रेशिमबागेत जातील. तेथे ते जवळपास साडेतीन तास थांबणार आहेत.

रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची समाधीही तेथेच आहे. या समाधीला ते अभिवादन करणार किंवा नाही याबद्दल त्यांच्या कार्यक्रमात उल्लेख नाही. परंतु तेथेही सुरक्षेची व्यवस्था केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

या तीन दिवसांत मुखर्जी यांचा रेशिमबागशिवाय दुसरा कोणताही कार्यक्रम नाही. प्रणव मुखर्जी 8 जूनला दुपारी 1 वाजता दिल्लीला परतणार आहे. मुखर्जी 6 ते 8 जूनपर्यंत तब्बल तीन दिवस नागपुरात थांबणार आहेत.कॉंग्रेसची स्थानिक नेतेमंडळी प्रणव मुखर्जींना भेटणार की नाही, याबद्दल उत्सुकता आहे.

First published: June 6, 2018, 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading