मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ओबीसींना 53 टक्के जागांवर संधीच मिळाली नाही, निवडणुका पुढे ढकला : प्रकाश शेंडगे

ओबीसींना 53 टक्के जागांवर संधीच मिळाली नाही, निवडणुका पुढे ढकला : प्रकाश शेंडगे

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendg) यांनी 21 डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलून 18 जानेवारीलाच घ्याव्या, अशी मागणी केली आहे.

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendg) यांनी 21 डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलून 18 जानेवारीलाच घ्याव्या, अशी मागणी केली आहे.

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendg) यांनी 21 डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलून 18 जानेवारीलाच घ्याव्या, अशी मागणी केली आहे.

मुंबई, 17 डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत (Local Body Elections) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्ह्यांतील सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम बदलला होता. ओबीसी आरक्षित असलेल्या जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. पण आता त्या जागांवर सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक घेतली जाईल, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलंय. या जागांवर आता 18 जानेवारीला मतदान होईल, असं निवडणूक आयोयगाने स्पष्ट केलंय. पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला राज्यातील ओबीसी (OBC) समाजाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendg) यांनी 21 डिसेंबरला होणारी निवडणूक पुढे ढकलून 18 जानेवारीलाच घ्यावी. कारण एससी, एसटींच्या आरक्षित जागा वगळून 53 टक्के जागांवर ओबीसींना संधी मिळालेली नाही, असा दावा केला आहे.

प्रकाश शेंडगे नेमकं काय म्हणाले?

"सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार आता ओबीसीच्या जागेवर होणाऱ्या निवडणूका 18 जानेवारीला होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की त्यांनी 21 तारखेला पार पडणारी निवडणूक पुढे ढकलावी आणि ती सुद्धा निवडणूक 18 जानेवारीलाच घ्यावी. कारण एससी, एसटी वगळून राहिलेल्या 53 टक्के जागांवर ओबीसी समाजाला संधी मिळालेली नाही. यामुळे ती संधी मिळू शकेल. याबाबतचं पत्र देखील मी निवडणूक आयोगाला देणार आहे. यासोबतच राज्य शासनाला देखील माझी विनंती आहे की त्यांनी तत्काळ ओमायक्रोन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पॅन्डमिक अॅक्ट लागू करावा. आणि जोपर्यंत इम्पिरीकल डेटा कोर्टात सादर करुन आरक्षण पुनर्स्थापित होई पर्यत निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करावी", अशी प्रतिक्रिया प्रकाश शेंडगे यांनी दिली.

हेही वाचा : राज्य सरकारला आणखी एक धक्का, निवडणुका वेळेनुसारच होणार, निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली

पंकजा मुंडे राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला

निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासह राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी.एस.मदान यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. "ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशामुळे ओबीसी उमेदवारांनी फक्त ओबीसी आरक्षीत जागांसाठी उमेदवारी अर्ज केले आहेत, त्यांनी खुला प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज भरले नाहीत. आमची मुख्य मागणी ही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होऊच नयेत अशी आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे इंपेरिकल डाटा उपलब्ध होई पर्यंत, ओबीसी आरक्षाणा शिवाय निवडणूका होणार असतील तर सर्वांना समान न्यायाप्रमाणे सर्वांसाठी संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. आत्ताची निवडणूक प्रक्रिया आरक्षणासह असल्यामुळे सर्वांना उमेदवारी अर्ज भरता आले नसल्यामुळे ती रद्द झालीच पाहिजे", असं पंकजा यांनी आयुक्तांना सांगितलं.

याआधी ओबीसी आरक्षित असलेल्या कोणत्या जिल्ह्यांतील किती जागांवर येत्या 18 जानेवारीला मतदान?

• भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 जागा

• भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 जागा

• राज्यातील 106 नगरपंचायती- 344 जागा

• महानगरपालिका पोटनिवडणुक- 1 जागा

First published: