'वंचित' मधल्या मुसलमानांना बोलण्याची मोकळीक - प्रकाश आंबेडकर

26 ऑगस्टला हैदराबादमध्ये ओवेसींसोबत बैठक असून त्या दिवसी जागावाटपावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 08:07 PM IST

'वंचित' मधल्या मुसलमानांना बोलण्याची मोकळीक - प्रकाश आंबेडकर

स्वाती लोखंडे, मुंबई 20 ऑगस्ट : MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी जागावाटपावर नाराजी व्यक्त केल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 'न्यूज18 लोकमत'कडे प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ते म्हणाले, MIM आणि आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. 26 ऑगस्टला मी हैदराबादला जाणार असून त्या दिवसी जागावाटपावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. इम्तियाजला जे वाटलं ते तो बोलला, काँग्रेस मधल्या मुसलमनासारखं नाही, वंचित मधल्या मुसलमानाना बोलण्याची मोकळीक आहे असंही ते म्हणाले.

आम आदमी पक्षासोबतही बैठक होणार असून त्यांनाही वंचितमध्ये सामावून घेतलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. वंचित आघाडीत MIM ने 74 जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी काँग्रेसला 144 जागांची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर काँग्रेस स्वीकारण्याची शक्यता नाही. त्यामुळे लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्व 288 जागा लढविण्याची वंचितची तयारी असल्याचा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

EDच्या नोटीसवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना दिला हा आदेश

काय म्हणाले होते खासदार जलील?

वंचित आम्हाला आमच्या जागांबद्दल अजून काही बोलायला तयार नाही म्हणून आम्हाला आता काळजी वाटायला लागली, असे वक्तव्य एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलं आहे. एमआयएमच्या वतीने आम्ही ज्या जागा आम्हाला पाहिजे, त्याची यादी वंचितच्या कोअर कमिटीला दिली आहे. तीन दिवसांत जागा देण्याचे वंचितच्या कोअर कमिटीने सांगितले होते. मात्र, अद्याप काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे आम्ही आता काळजीत पडलो, अशीही जलील यांनी सांगितले आहे. लवकरच प्रकाश आंबेडकर यांना भेटून जागा वाटपाची मागणी करणार असल्याचेही खासदार जलील यांनी सांगितले.

Loading...

राष्ट्रवादीला मोठा धक्का? छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर, मुंबईत तातडीने बोलावले

प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला नवी ऑफर

प्रकाश आंबेडकर यांनी आता काँग्रेसला नवी ऑफर दिलीय. विधानसभा निवडणुकीसाठी 288 पैकी 144 जागा काँग्रेसनं लढवाव्या अशी ऑफर आंबेडकरांकडून देण्यात आलीय. तर उर्वरीत 144 जागा वंचित बहुजन आघाडी लढवेल, असं आंबेडकरांनी सांगितलं. याआधी जुलै महिन्यात आंबेडकरांनी काँग्रेसला फक्त 40 जागांची ऑफर दिली होती. त्यानंतर वंचित ही भाजपची बी टीम आहे. या काँग्रेसच्या आरोपांचा हवाला देत, काँग्रेस या आरोपांवर खुलासा करत नाही तोवर त्यांच्याशी आघाडीची चर्चा करणार नाही अशी भूमिका आंबेडकरांनी स्वत:च पत्रकार परिषदेत मांडली होती. त्यानंतर आता पुन्हा आंबेडकरांनी काँग्रेसला थेट 144 जागांची ऑफर देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर तुटेपर्यंत ताणून धरणार असून आघाडी शक्यच नसल्याचं बोललं जातंय.

VIDEO: विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मतभेद? 'हे' आहे कारण

वंचितची ही ऑफर काँग्रेस स्वीकारणं शक्यच नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. वंचितकडे विजयी होण्याची शक्ती नसली तरी आघाडीच्या उमेदवारांना पाडण्याची ताकद आहे.

सोसायटीत गाडी लावताय तर सावधान, पाहा या भुरट्या चोराचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...