• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • वंचित बहुजन आघाडीकडून आज राज्यव्यापी बंदची हाक

वंचित बहुजन आघाडीकडून आज राज्यव्यापी बंदची हाक

सुधारित नागरिकत्व कायदा आणि NRC विरोधात बंदचं आवाहन.

 • Share this:
  मुंबई, 24 जानेवारी: वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. CAA आणि NRC विरोधात तसंच, देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्याचं आवाहन भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. यासोबतच शाळा आणि महाविद्यालयांनीही बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. महाराष्ट्र बंदमध्ये 50हून अधिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात आज या बंदला आज कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीनं पुकरालेल्या बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी बंद सरकारच्या शिक्षण विभागाकडून सहकार्य मिळावे, यासाठी वंचित आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी निवेदन दिलं आहे. CAA आणि NRC विरोधात राज्यभरातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या बंदला हे विद्यार्थी पाठिंबा देण्यार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच ओला-अबर, रिक्षा संघटना, बँकांचे युनियन, एसटी महामंडळ, तसंच वाहतूक संघटनांना बंदला पाठिंबा देण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तर असल्फा परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी बस अडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान बंदला राज्यातून किती पाठिंबा मिळतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:Akshay Shitole
  First published: