पनवेल, 8 मार्च : 'पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाने खोटं बोलू नये. राफेलची फाईल गायब झाली, असं सांगतात. पण अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी घेतलेला हा निर्णय आता सत्यात उतरत आहे,' असं म्हणत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
'राफेल आणि सुखोई ही दोन्ही विमाने सारखीच आहेत. याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राफेलच्या नावाने फक्त फसविले जात आहे,' असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
एअर स्ट्राइकवरून पंतप्रधान लक्ष्य, काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
- हवाई हल्याचे गांभीर्य भाजप, पंतप्रधान आणि त्यांच्या नेत्यांनी घालवले.
- हल्ल्यातील हवा काढण्याचे काम अमित शहांनी केलं आहे.
- आंतरराष्ट्रीय मीडियाने मोठी जीवितहानी झाली नसल्याचे सांगून भाजपाच्या दाव्याची चिरफाड केली आहे.
- हल्ल्यानंतर पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. एवढे पाकिस्तानी झेंडे येतात कुठून? अगोदरच झेंडे प्रिंट केले होते का ?
- हल्ला होण्याचे आधीच ठरले होते का ?
- आम्हाला पाकिस्तान वर हल्ला करायला 12 दिवस लागले. पाकिस्तानने चार तासात वार केले.
- आम्ही त्यांच्या दहशतवाद्यांवर हल्ला केला. पाकिस्तानने आपल्या थेट लष्करावर हल्ला केला. मग पंतप्रधान करतात काय. का गप्प आहेत?
- जुमलेबाजी करणारे सरकार घालवा. देशाची बदनामी करणारे सरकार पडणार का?
VIDEO : राष्ट्रवादीचं तिकीट आणि भाजपमध्ये जाण्याची चर्चा, काय म्हणाले उदयनराजे?