भाजप आमदारानंतर आता प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, नरेंद्र मोदींवर केला गंभीर आरोप

भाजप आमदारानंतर आता प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, नरेंद्र मोदींवर केला गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

  • Share this:

सोलापूर, 25 जून: भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

देशात कोरोनाच्या संसर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असून त्यांच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणून कार्यक्रम केला, त्यामुळे भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. त्याला पंतप्रधान जबाबदार आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा... मुंबईपेक्षा या शहरात कोरोनाचा सर्वाधिक कहर; चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर

प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात कोरोनापेक्षा जास्त लोक टीबीने (क्षयरोग) दगावले होते. टीबीच्या वेळेस लॉकडाऊन झालं नव्हतं. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन झालं. त्यामुळे राज्यात अनेक जण उपाशी आहेत, रोजगार बंद आहेत, असं आंबेडकर म्हणाले. सर्व ठिकाणी पालकमंऱ्यांचा हस्तक्षेपामुळे परिस्थिती बिघडली आहे. सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात अधिकार दिले पाहिजेत, असंही ते म्हणाले.

शासनानं ब्लॅकमेल केलं...

सर्वसामान्यात कोरोनाची रिंगटोन लावून भीती निर्माण केली जात आहे, 3 महिने झाले तरी रिंगटोन बदललं नाही, यामागे काय षडयंत्र आहे हे मोदींनी सांगितल्याशिवाय कळणार नाही. शासनाने आपल्याला ब्लॅकमेल केलं. जीवन उद्धवस्त केलं, 30 तारखेची वाट न बघता सामान्य आयुष्य जीवन जगायला सुरुवात करा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केलं आहे.

हेही वाचा...सलून सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळानं घेतला मोठा निर्णय

आरोग्य विभागाने आम्हाला जगवलं, लॉकडाऊनमुळे नाही. लॉकडाऊनमुळे अनेक लोक मानसिक रुग्ण झाले आहे. हे सरकार कंगाल आहे, केंद्र आणि राज्य सरकार भिकारी सरकार आहेत. त्यामुळे जगात कच्च्या तेलाच्या किमती पडलेल्या असताना इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. ही नवीन चोरी आहे, हे सरकार संघटित गुन्हेगारांचे आहे.

First published: June 25, 2020, 5:57 PM IST

ताज्या बातम्या