MIM ने युती तोडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया

MIM ने युती तोडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराज होऊन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला.

  • Share this:

प्रशांत मोहिते, नागपूर, 8 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. जागावाटपावरून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराज होऊन या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढत आपली भूमिका जाहीर केली. त्यावर आता प्रकाश आंबडेकरांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैद्राबादवरून  आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जो पर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तो पर्यंत आमची युती कायम आहे,' असं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतून MIM बाहेर पडलं आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यात जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे MIM  ने हा निर्णय घेतला आहे.

जागावाटपाबद्दल MIM चा सन्मान ठेवला गेला नाही, असं इम्तियाज जलील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे वेगळी समीकरणं ठरणार होती. पण आता MIM बाहेर पडल्यामुळे पुन्हा एकदा ही समीकरणं बदलू शकतात. MIM ने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

MIM ला 98 जागांवर निवडणूक लढवायची होती पण ही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे असदुद्दीन ओवेसी यांच्या या पक्षाने वंचित बहुजन आघाडीबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

लोकसभा निवडणुकीत MIM ने वंचित बहुजन आघाडीतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत औरंगाबादमध्ये MIM चे इम्तियाज जलील हे खासदार झाले पण MIM सोबत गेल्यामुळे मुस्लीम मतं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नाहीत.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या पण जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीत फूट पडली आहे.

SPECIAL REPORT: गणेश नाईकांच्या एण्ट्रीनंतर नवी मुंबईत भाजपमध्येच होणार संघर्ष?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading