विधानसभेआधी प्रकाश आंबेडकर करणार मोठी घोषणा, कुणाला कोणतं पद मिळणार?

विधानसभेआधी प्रकाश आंबेडकर करणार मोठी घोषणा, कुणाला कोणतं पद मिळणार?

विधानसभा निवडणुकीला काही महिनेच बाकी असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जून : वंचित बहुनज आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर अनेक महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहेत. तसंच विधानसभेच्या दृष्टीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाईल.

विधानसभा निवडणुकीला काही महिनेच बाकी असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. वंचित बहुजन आघाडीने तयारी सुरू केली आहे. प्रकाश आंबेडकर हे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत सध्याची राजकीय परिस्थिती, ईव्हीएमबाबतच्या तक्रारी याबाबत भाष्य करतील. तसंच 'वंचित'ची संघटनात्मक बांधणी व्हावी, यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करणार आहेत. यामध्ये कुठल्या नेत्याला कोणती जबाबदारी दिली जाते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

विधानसभेसाठी काय असणार प्लॅन?

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबडेकरांना आघाडीत येण्यासाठी खुली ऑफर दिली. याबाबत काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी 'न्यूज18 लोकमत'सोबत बोलताना पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली होती.

'काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी आम्ही ऑफर दिली होती. पण काँग्रेसकडून सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. तुम्ही सलग तीन निवडणुकांत हरलेल्या 12 जागा आम्हाला द्या, असं आम्ही त्यांना म्हटलं होतं. पण काँग्रेसनं अनुकुलता दाखवली नाही. त्यानंतर निवडणुकीत आणि आता निवडणुकीनंतर काँग्रेसकडून आमच्यावर भाजपची बी टीम असा आरोप होत आहे. त्यामुळे आमच्या आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने या आरोपाबाबत एकदा आपली भूमिका जाहीर करावी,' असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं.

'विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत आमचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेसच्या ऑफरवर आम्ही आमच्या पक्षाच्या बैठकीत विचारमंथन करू. त्यानंतर आमची या आघाडीबाबतची भूमिका जाहीर करू. पण आम्ही आमचा फायदा असणाराच निर्णय घेऊ,' असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आताच विधानसभा निवडणुकीतले आपले पत्ते खुले करण्यास नकार दिला.

सानियासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस' उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं

First published: June 21, 2019, 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading