मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शिवसेना-काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव, पण...', प्रकाश आंबेडकरांच्या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणाला नवा ट्विस्ट!

'शिवसेना-काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव, पण...', प्रकाश आंबेडकरांच्या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणाला नवा ट्विस्ट!

Prakash Ambedkar on alliance with Shivsena Congress

Prakash Ambedkar on alliance with Shivsena Congress

मागच्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य घडल्यामुळे राज्यातलं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं आहे, त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या नव्या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणाला नवा ट्विस्ट येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli, India
  • Published by:  Shreyas

सांगली, 20 सप्टेंबर : मागच्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य घडल्यामुळे राज्यातलं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं आहे, त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या नव्या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणाला नवा ट्विस्ट येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 'आम्ही अन्य पक्षासोबत समझोता करत नाही, असा आरोप आमच्यावर होतो, पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला आम्ही आघाडी करतो असा प्रस्ताव पाठवला आहे, मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही,' असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

'श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी सर्व प्रयत्न केले. श्रीमंत मराठ्यांबरोबर गरीब मराठ्यांची यापुढे युती फार काळ चालणार नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते. मुख्यमंत्र्यांनी फसवणूक बंद करावी आणि आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा,' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

'संविधानाचा ढाचा तोडण्याचा प्रयत्न राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. नेहरूंनी कबुतर सोडली होती, मात्र मोदींनी चित्ते सोडले, म्हणजे दहशत दाखवली आहे,' अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरही प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे. 'भारत तुटला कुठे आहे, की त्याला जोडायला. देश कुठे चालला आहे आणि काँग्रेसचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे. देशात नवीन आयुध वापरावी लागतील. लोकांशी कनेक्ट व्हावं लागेल,' असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

First published:

Tags: Prakash ambedkar, Shivsena