प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका, वंचित बहुजन आघाडीत फूट!

प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका, वंचित बहुजन आघाडीत फूट!

उमेदवारी देताना प्रकाश आंबेडकरांनी सेटलमेंट केल्याचा आरोपही भारिपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

  • Share this:

माढा, 10 एप्रिल : ऐन निवडणुकांच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक सदस्य डॉ. इंद्रकुमार भिसे, शफिक पारकर, आप्पासाहेब करे, जगन्नाथ जानकर यांनी आघाडीमधून फुटून अपक्ष उमेदवार सचिन पडळकर यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना माढ्यात मोठा धक्का बसला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या एककल्ली काराभाराला कंटाळून अपक्ष उमेदवार सचिन पडळकर यांना पाठिंबा देणार असल्य़ाची भूमिका आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे. त्य़ामुळे पहिल्या टप्प्यातील निवड़णुका अगदी उद्यावर आल्यानंतर आता भारिपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, माढातून लोकसभा मतदारसंघ वंचित आघाडीचे उमेदवार विजय मोरे यांना उमेदवारी देताना विश्वासात न घेतल्याचा आरोपही भारिपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या नेत्याला पाठिंबा देण्याऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

बरं इतकंच नाही तर अहमदनगर, शिर्डी इथल्या उमेदवारी देताना प्रकाश आंबेडकरांनी सेटलमेंट केल्याचा आरोपही भारिपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता यासगळ्यावर प्रकाश आंबेडकर काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हेही वाचा: 'उद्धव ठाकरेंकडून माझी हकालपट्टी मान्य पण भाजप उमेदवाराला विरोधच'

सर्व जागा लढवणार

3 फेब्रुवारीला प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढवणार आहे अशी घोषणा केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीची स्थापणा केली आहे. ही आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण भाजपविरोधातील मतांमध्ये यामुळे विभागणी होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

काय होती आंबेडकरांची मागणी?

'काँग्रेसकडून आघाडीचा कोणताही प्रस्ताव आला नसून जोवर आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत जागांची चर्चा होणार नाही' असं भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं. तसंच 'काँग्रेस जर 12 जागा देणार नसेल तर वंचित बहुजन आघाडी राज्यातील 48 जागांवर तयारी पूर्ण झाली असून आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोर जाऊ,' असा इशाराही आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला होता.

शिर्डीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. 'चार किंवा सहा जागा अशी आमची मागणी फक्त प्रसार माध्यमात सुरू असून जागा विषयी आमच्यात कुठलीच चर्चा नाही. मात्र, काँग्रेस तीन वेळा ज्या लोकसभा निवडणुकीत जागा हरल्या त्या जागांची आमची मागणी असून कोणत्या 12 जागा द्यायच्या त्या काँग्रेसनेच ठरवावे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली होता.

मोदी हे घरपणाला मुकलेले गृहस्थ, शरद पवारांची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 07:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading