प्रकाश आंबेडकर तुटेपर्यंत ताणणार, काँग्रेस राहणार का वंचित?

प्रकाश आंबेडकर तुटेपर्यंत ताणणार, काँग्रेस राहणार का वंचित?

वंचितची ही ऑफर काँग्रेस स्वीकारणं शक्यच नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई 18 ऑगस्ट : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी आता काँग्रेसला नवीन ऑफर दिलीय. विधानसभा निवडणुकीसाठी 288 पैकी 144 जागा काँग्रेसनं लढवाव्या अशी ऑफर आंबेडकरांकडून देण्यात आलीय. तर उर्वरीत 144 जागा वंचित बहुजन आघाडी लढवेल असं आंबेडकरांनी सांगितलं.  याआधी जुलै महिन्यात आंबेडकरांनी काँग्रेसला फक्त 40 जागांची ऑफर दिली होती. त्यानंतर वंचित ही भाजपची बी टीम आहे या काँग्रेसच्या आरोपांचा हवाला देत, काँग्रेस या आरोपांवर खुलासा करत नाही तोवर त्यांच्याशी आघाडीची चर्चा करणार नाही अशी भूमिका आंबेडकरांनी स्वत:च पत्रकार परिषदेत मांडली होती. त्यानंतर आता पुन्हा आंबेडकरांनी काँग्रेसला थेट 144 जागांची ऑफर देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर तुटेपर्यंत ताणून धरणार असून आघाडी शक्यच नसल्याचं बोललं जातंय.

वंचितची ही ऑफर काँग्रेस स्वीकारणं शक्यच नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. वंचितकडे विजयी होण्याची शक्ती नसली तरी आघाडीच्या उमेदवारांना पाडण्याची ताकद आहे.

'मदत नको, भीक आवरा' संभाजीराजे विनोद तावडेंवर संतापले, पाहा हा VIDEO

लोकसभा निवडणुकीत किमान 5 ते 6 जागांवर वंचितमुळे काँग्रेसचे उमेदवार पडल्याचं सिद्ध झालंय. अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना लाखाची मतं पडली होती. विधानसभेत तर मतांचं अंतर आणखी कमी होते. त्यामुळे यावेळी किती फटका बसतो यावर मोठं गणित अवलंबून आहे.

औरंगाबाद विधानपरिषद : काँग्रेसच्या बंडखोर नेत्यामुळं 'युती'चा विजय पक्का

प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसशी आघाडी करण्याची इच्छा नाही. ते फक्त चर्चेचा देखावा उभा करत असल्याची काँग्रेसची भावना आहे. त्यामुळे वंचितकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचं काँग्रेसचं धोरण असल्याचं बोललं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसची वंचितसोबत आघाडी करण्यासाठी उत्सुक नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत फिट्टी-फिट्टीचा फॉर्मुला ठरल्यामुळे आपल्या वाट्याच्या जागा काँग्रेसला वंचितसाठी सोडाव्या लागतील. प्रकाश आंबेडकरांची आत्ताची भूमिका ही काँग्रेससाठी पुरक नसल्याने तेही चर्चेत फार वेळ घालणार नसल्याचे संकेत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 19, 2019, 9:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading