सरकारची अवस्था दारूड्यासारखी, गड किल्ल्यांच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

वंचित बहुनज आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही गड किल्ल्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 03:51 PM IST

सरकारची अवस्था दारूड्यासारखी, गड किल्ल्यांच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

प्रशांत मोहिते, नागपूर, 8 सप्टेंबर : सरकारने राज्यातील 25 गड-किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेने राज्यभरात मोठा गदारोळ झाला. विरोधकांसह सोशल मीडियावरही लोकांनी सरकारवर जोरदार टीका केली. वंचित बहुनज आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही याच मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली आहे.

‘या सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. एखाद्या दारुड्याप्रमाणे यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे आता त्यांनी गडकिल्ले विकायला काढले आहेत,’ अशी खरमरीत टीका प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात केली आहे.

MIM बाबतही केला खुलासा

'आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जो पर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तो पर्यंत आमची युती कायम आहे,' असं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतून MIM बाहेर पडलं आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यात जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे MIM ने हा निर्णय घेतला आहे.

Loading...

जागावाटपाबद्दल MIM चा सन्मान ठेवला गेला नाही, असं इम्तियाज जलील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे वेगळी समीकरणं ठरणार होती. पण आता MIM बाहेर पडल्यामुळे पुन्हा एकदा ही समीकरणं बदलू शकतात. MIM ने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

SPECIAL REPORT : MIM च्या निर्णयावर वंचितने ठेवले कानावर हात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 03:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...