मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा, नाहीतर 288 जागा जाहीर करणार

प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा, नाहीतर 288 जागा जाहीर करणार

Mumbai: Bharipa Bahujan Mahasangh President Prakash Ambedkar interacts with media during a press conference in Mumbai on Thursday. PTI Photo by Shashank Parade(PTI1_4_2018_000149B)

Mumbai: Bharipa Bahujan Mahasangh President Prakash Ambedkar interacts with media during a press conference in Mumbai on Thursday. PTI Photo by Shashank Parade(PTI1_4_2018_000149B)

लोकसभेत आम्ही भाजपची बी टीम आणि विधानसभेत सोबत या हे काय आहे? याचा खुलासा काँग्रेसने करावा.

  सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद 28 जुलै :  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिलाय. काँग्रेसने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं ते म्हणाले, आम्ही 288 जागा जाहीर करत नाही तोपर्यंत त्यांना आमची ऑफर राहिल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. वंचितच्या वतीने काँग्रेसला 40 जागांची ऑफर देण्यात आलीय. तर काँग्रेस 40 जागा सोडणं अशक्य असून लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. निवडणुकीसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे तयार, शिवसेनेचं टेन्शन वाढवणारे आकडे समोर प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसला वंचित सोबत विधानसभा निवडणूक लढवायची असेल तर आम्ही 40 जागांची ऑफर त्यांना देत आहोत. काँग्रेस सोबत जायचे की नाही याचा दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक सोडून जात आहेत. हा या दोन्ही पक्षाच्या धोरणांचा पराभव आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचितची ताकद वाढली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. आंबेडकरांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे आता विधानसभेत वंचितचा प्रभाव आणखी वाढणार आहे. वंचित मध्ये आयाराम, गयारामांना प्रवेश नाही असंही त्यांनी सांगितलं. RSS आणि BJPला कधीही तत्वे नव्हती. त्यांनी तत्वाचा फक्त मुलामा दिला, वर्तमान पत्रांनी त्यांना महत्व दिलं, काँग्रेस आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार केला त्याचा पाढा RSS आणि BJP ने वाचला. लोकसभेत आम्ही भाजपची बी टीम आणि विधानसभेत सोबत या हे काय आहे याचा खुलासा काँग्रेसने करावा.

  काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा बच्चेकंपनीसोबत डान्स, VIDEO व्हायरल

  लोकसभेची निवडणूक ही वंचित विरुद्ध भाजप होईल असं वाटत होतं पण EVM मुळे ते होऊ शकलं नाही, पण आता विधानसभेची निवडणूक वंचित विरुद्ध भाजप अशी होईल. राज ठाकरे यांची निवडणूक आयोगासोबतची भेट ही पब्लिसिटी स्टंट होता, पब्लिसिटी स्टंटच्या पाठीशी मी नाही. EVM बाबत आम्ही कोर्टात जाणार आहोत, कोर्ट म्हणतं EVMमध्ये घोळ नाही, पण कुठे मतदान कमी निघालं तर कुठे जास्त निघालं याचं उत्तर कोर्टाला द्यावं लागेल. MIM आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आम्ही सोबत निवडणूका लढणार आहोत.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Congress, Maharashtra Assembly Election 2019, Prakash ambedkar

  पुढील बातम्या