'प्रियांका गांधींनी केवळ हवा केली, मोदींना आव्हान दिले असते तर प्रचाराला गेलो असतो'

'प्रियांका गांधींनी केवळ हवा केली, मोदींना आव्हान दिले असते तर प्रचाराला गेलो असतो'

प्रियांका गांधी जर मोदींच्या समोर उभ्या राहिल्या असत्या तर त्यांच्या प्रचाराला गेलो असतो. मात्र, प्रियांका यांनी हवा केली आणि उमेदवारी केली नाही. मोदी त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.

  • Share this:

नाशिक, 26 एप्रिल- पाच वर्षे विष प्राशन करुन पाहिले आहे, आता एकदा संधी देऊन बघा, असे आवाहन करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, RSS आणि भाजपचा पराभव करायचा असेल तर मुस्लिमांनी वंचित बहुजन आघाडीच्या माघे उभे राहिले पाहिजे. प्रियांका गांधी जर मोदींच्या समोर उभ्या राहिल्या असत्या तर त्यांच्या प्रचाराला गेलो असतो. मात्र, प्रियांका यांनी हवा केली आणि उमेदवारी केली नाही. मोदी त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.

BJP-RSS दुतोंडी सापासारखे.. मोदी सरकारने काळ्या पैशावर डल्ला मारला

प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे झालेल्या सभेतही मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. भाजप-आरएसएस हे दुतोंडी सापासारखे असून आरएसएस ही अतिरेकी संघटनेसारखी असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. केंद्र सरकार हे चोर व डाकूचे सरकार असून नोटाबंदी करून यांनी सर्वात जास्त काळ्या पैशावर डल्ला मारल्याचा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

नोटबंदी सर्वात मोठा घोटाळा असून त्यातून जनतेची लूट करण्यात आली. पंतप्रधान हे गुजरातचे जास्त कौतुक करतात. त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान आहे की फक्त गुजरातचे, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. प्रकाश आंबेडकरांनी नोटाबंदीवरुनही मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला होता. ते म्हणाले, नोटांवर मालकी ही गव्हर्नरची असते. त्यामुळे पंतप्रधानाना नोटबंदी करण्याचा अधिकार कोणी दिला. याबाबत सुप्रीम कोर्टात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

VIDEO: भिवंडीत उमेदवाराच्या कार चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

First published: April 26, 2019, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading